हिंदु आतंकवाद सिद्ध करण्याचे विदेशी शक्तींचे षड्यंत्र ! – सौ. लक्ष्मी पै

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभा
याच हिंदु राष्ट्र स्थापनेचे आशास्थान ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य अगर्त

बेळ्तंगडी (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन या कन्नड भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन या कन्नड भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करतांना डावीकडून सौ. लक्ष्मी पै, श्री. सुब्रह्मण्य अगर्त आणि श्री. गुरुप्रसाद गौडा

या हिंदु धर्मजागृती सभेतील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परात्पर गुरू डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन या कन्नड भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.

बेळ्तंगडी (तालुका इळींतिल, कर्नाटक) – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदू निश्‍चितपणे स्वतःचे काही ना काही योगदान देऊ शकतो. सात्त्विक शक्तींसमोर कुठलीही अन्याय्य प्रवृत्ती टिकाव धरू शकत नाही. स्वत:मध्ये सात्त्विक शक्ती निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, तसेच साधना करणे आवश्यक आहे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभा याच हिंदु राष्ट्र स्थापनेचे आशास्थान आहेत. अशा सभांच्या माध्यमातूनच पुन्हा जगात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे दूर नाही, असे प्रतिपादन बेळ्तंगडी येथील प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सुब्रह्मण्य अगर्त यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, तसेच सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै उपस्थित होत्या.

 

सभेतील वक्त्यांचे तेजस्वी विचार

हिंदूंनी संतांच्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास सिद्ध व्हावे ! – गुरुप्रसाद गौडा

त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी धर्माचे रक्षण केले. द्वापरयुगात श्रीकृष्णाने पांडवांच्या माध्यमातून धर्मसंस्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार मावळ्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपण संतांच्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास सिद्ध झाले पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी अत्यंत श्रेष्ठ अशा हिंदु धर्माच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे क्रमप्राप्त आहे.

हिंदु आतंकवाद सिद्ध करण्याचे विदेशी शक्तींचे षड्यंत्र ! – सौ. लक्ष्मी पै

तथाकथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे. कोणतीही हिंदुत्वनिष्ठ संघटना असे कृत्य करूच शकत नाही. काहीही करून हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी विदेशी शक्तींकडून सुनियोजित षड्यंत्र रचले जात आहे. हल्लीच्या काळात स्वत:ला विचारवंत म्हणवून घेणार्‍या विचारशून्य लोकांमुळे हिंदु धर्माची अपकीर्ती होत आहे.

या सभेचा आरंभ वेदमूर्ती श्री. सुब्रह्मण्य प्रसाद आणि श्री. श्रीराम यांनी केलेल्या वेदमंत्रपठणाने झाला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद हेगडे यांनी शंखनाद केला. हिंदु जनजागृती समितीचा परिचय हिंदु जनजागृती समितीचे श्री. जनार्दन गौड यांनी करून दिला. सभेचे सूत्रसंचालन कु. चेतना यांनी केले. या सभेस अनेक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. त्यानंतरच्या संवाद सभेतही अनेक धर्मप्रेमी हिंदूंनी सहभाग घेतला.

 

उपस्थित मान्यवर

या सभेस हिंदु धर्मप्रेमी श्री. रवी शिल्वा, वाणीश्री भजन मंदिराचे अध्यक्ष श्री. बालकृष्ण, श्री. लक्ष्मण मित्तिल, श्री. विजयकुमार कल्लळीके, श्री. सुंदर शेट्टी एंजिरपळिके, अधिवक्ता श्याम प्रसाद कैलार, श्री. अशोक इळंतिल, श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेचे सेवा प्रतिनिधी श्री. सीतराम आळ्व, बंदारू ग्रामपंचायतीचे अध्यक्ष न्या. उदय कुमार बी.के, श्री. राजशेखर रै कराय, श्री. हरिप्रसाद शेट्टी पुत्तुरू आदी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी धार्मिक आचरणाचे महत्त्व समाजाला समजून सांगणार्‍या सनातनच्या ग्रंथांचे, तसेच धर्मशिक्षणाविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.