मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात विविध मान्यवरांच्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेटी

सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर ग्रंथ पहातांना (१) खासदार श्री. राजन विचारे

मुंबई  – दत्तजयंतीनिमित्त मुंबई आणि आजूबाजच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध मान्यवरांनी भेट देऊन ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला.

वरळी येथील ग्रंथप्रदर्शनाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते श्री. मनोहर जोशी, नगरसेविका सीमा पारकर यांनी भेट दिली. सानपाडा येथील ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे खासदार श्री. राजन विचारे, नगरसेवक श्री. सोमनाथ वासकर, नगरसेवक श्री. मनोहर मढवी यांनी भेट देऊन ग्रंथ खरेदी केले. मुलुंड (पश्‍चिम) येथील रेल्वेस्थानकासमोर लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे आमदार सरदार श्री. तारा सिंग, विश्‍व हिंदु परिषदेचे मुलुंडचे जिल्हा सहमंत्री अधिवक्ता संतोष दुबे यांनी भेट दिली. सानपाडा येथील ग्रंथ प्रदर्शनाला शिवसेनेचे आमदार श्री. अजय चौधरी यांनी भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका सौ. कमल देशमुख यांनी त्यांना सनातनच्या कार्याची माहिती देऊन दैनिक सनातन प्रभातचा दत्तमाहात्म्य विशेषांक भेट दिला. दत्तजयंतीनिमित्त जिल्ह्यात एकूण ५५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनला शेकडो धर्मप्रेमी, दैनिक सनातन प्रभातचे वाचक, जिज्ञासू यांनी भेटी दिल्या.

 

मुलुंड येथील पाक्षिक सनातन प्रभातचे वाचक मुकेश तिवारीयांना आलेली वैशिष्टपूर्ण अनुभूती

श्री. मुकेश तिवारी यांना दत्तजयंतीचा विसर पडला होता. अचानक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी डोळ्यांसमोर येऊन आज दत्तजयंती असून सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर जा, असे सांगितले. त्यांनी लगेचच दुकान बंद करून ते ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी गेले. दत्तजयंतीची आठवण करून दिल्याविषयी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आभार मानले. त्यांनी आठवण करून दिली नसती, तर मी या अनमोल क्षणाला मुकलो असतो. सनातनच्या साधकांचा सेवाभाव पहाता मीही माझ्या प्रापंचिक कामातून मुक्त झाल्यावर पूर्ण वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी देण्याचे निश्‍चित केले आहे, असे त्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात