डोंबिवली येथे सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी जनजागृती बैठकीत सनातन संस्थेचा सहभाग

बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

डोंबिवली, ८ मार्च  : श्री सिद्धीविनायक ट्रस्टमध्ये माजी विश्‍वस्तांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती आणि हिंदूंचे संघटन यासाठी शास्त्रीनगर येथील महाराणा प्रताप शाळेत हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली. यात २० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. श्री सिद्धीविनायक ट्रस्ट भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. अजय संभूस यांनी ‘भ्रष्टाचार कसा झाला ?’ याविषयी माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरुण कुलकर्णी, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. शंभु गवारे उपस्थित होते. बैठकीच्या माध्यमातून डोंबिवली पूर्व येथे १० मार्च आणि १७ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात