धर्मसभा विशेष – धर्मक्रांतीसाठी आध्यात्मिक बळही हवे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव धर्मसभा विशेष – सभेतील वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे !

यंदा १९ नोव्हेंबरला जळगाव येथे ६१ वी धर्मजागृती सभा पार पडली. सभेच्या प्रसारकार्यापासून आढावा बैठकांमध्ये हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचा सभेला पाठिंबा, धर्माभिमान्यांनी उत्साहाने गावोगावी जाऊन केलेला प्रसार, सामाजिक संकेतस्थळांवरून विविध मान्यवरांनी सभेचे दिलेले निमंत्रण आणि प्रसिद्धीमाध्यमांचे अमूल्य सहकार्य यांमुळे ही धर्मजागृती सभा यशस्वीपणे पार पडली. भविष्यातील उज्ज्वलतेची ही जणू नांदीच होती !

मशाल घेऊन झालेले धर्मविरांचे आगमन
ढोल-ताशांसमवेत युवकांचा सहभाग
हिंदु धर्मजागृती सभेच्या वातावरणात ब्रह्मवृंदांकडून वेदमंत्र निनादला । संत, मान्यवरांच्या उपस्थितीत सभारूपी धर्मयज्ञास आरंभ झाला ॥
शंखनादाचा हुंकार घुमला ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रप्रेमी प्रा. रामेश्‍वर मिश्र नतमस्तक झाले !
‘हिंदु’ म्हणून धर्माभिमान जागवला । हिंदुत्वाची खूण म्हणून मस्तकी टिळा लावला ।
बालमने देती संदेश धर्म आणि संस्कृती यांचे पालन करण्याचा । चला हिंदूंनो, जपूया वारसा देशाच्या आध्यात्मिकतेचा ॥
१८ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती

 

धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग हेच जळगाव येथील हिंदु धर्मजागृती
सभा यशस्वी होण्यामागील मर्म ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचे आणि भारतवर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे घडणार्‍या अद्वितिय घटनांचा उच्चार त्या घडण्यापूर्वीच होतो. अलौकिक प्रतिभा लाभलेल्या महर्षि वाल्मीकि यांनी रामायण रचले आणि त्यानंतर पृथ्वीतलावर ऐतिहासिक असे रामराज्य अवतरले. श्रीकृष्णाच्या जन्मापूर्वीही दैवी आकाशवाणी झाली आणि पुनश्‍च एकदा धर्मराज्य साकार झाले.

आता त्या जाज्वल्य इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितल्याप्रमाणे देशातील सध्याचे अराजक संपून वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. सर्वत्रचे हिंदू त्यासाठी कार्यरत आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेचा धर्मयज्ञ प्रज्वलित करण्यासाठी लागणार्‍या धगधगत्या निखार्‍यांचे गाव म्हणजे जळगाव आणि धर्मकार्यातील शिलेदार म्हणजे जळगावनगरीतील प्रखर धर्माभिमानी हिंदू ! जळगाव येथे आतापर्यंत झालेल्या विराट धर्मजागृती सभा याची जणू साक्षच आहेत ! हिंदूंचे अपूर्व संघटन, धर्मकार्यात योगदान देण्याची हिंदूंची तळमळ हे सर्वत्रच्या हिंदूंना शिकण्यासारखे आहे.

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभा केवळ हिंदु जनजागृती समितीची नसून प्रत्येक संघटनेला ती स्वत:ची वाटते. त्यामुळे धर्मप्रेमी १ मास ते ३ आठवडे झोकून देऊन सेवा करतात. या सर्वांमधून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांमध्ये संघभाव निर्माण झाल्याचे लक्षात येते. सभा केवळ एका संघटनेची नसून धर्माची आणि हिंदुत्वाची आहे. आमचे योगदान हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आहे, असा सर्वांचाच व्यापक विचार पहायला मिळाला. जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी होण्यामागील हिंदुत्वनिष्ठांचे अशा प्रकारचे योगदान अमूल्य ठरले !

१. सभेसाठी धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त पुढाकार !

धर्मजागृतीच्या प्रसारबैठकांचे नियोजन करतांना काही ठिकाणी बैठका ठरवण्यासाठी समितीचे कार्यकर्ते गेल्यावर तेथील धर्माभिमानी सांगायचे, तुम्ही आमच्या येथे बैठक घेऊ नका. तुमचा अमूल्य वेळ येथे दवडू नका. तो वेळ अन्य ठिकाणी द्या; कारण आम्ही सर्व जण सभेला येणारच आहोत. अन्य ठिकाणच्या धर्मप्रेमींना तुम्ही वेळ दिलात, तर आपल्या सभेला अनेक लोक येतील. आम्ही सर्व नियोजन केलेलेच आहे. यातून धर्माभिमान्यांची व्यापकता, पुढाकार घेणे आणि समितीच्या कार्यकर्त्यांच्या वेळेचे अमूल्य आहे, असा त्यांचा भाग लक्षात आला.

२. आदर्श वाहनफेरीसाठी पुढाकार घेणारे हिंदुत्वनिष्ठ !

पूर्वी केवळ वाहनफेरीत सहभागी होणारे धर्मप्रेमी आता वाहनफेरीतील सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण यांसाठी पुढाकार घेत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संदेश देणारी वाहनफेरी आदर्श व्हायला हवी, यासाठी सर्वांची धडपड, प्रयत्न पहायला मिळाले. समाजातूनही अनेकांनी वाहनफेरी आदर्श असल्याचे मत व्यक्त केले.

३. समितीचे कार्यकर्ते पोहोचण्यापूर्वीच बैठकांचे आयोजन करणे

समितीचे कार्यकर्ते गावात बैठक ठरवायला जाण्यापूर्वीच गावातील मंडळी पुढाकार घेऊन बैठकांचे आयोजन करतात. सभेला जाण्यासाठी वाहनाचे नियोजन स्वत:हून करायचे. यावरून समिती आणि हिंदु धर्मजागृती सभा यांविषयी सर्वांमध्ये निर्माण झालेला विश्‍वास अन् आधार दिसून आला.

४. धर्मप्रेमींच्या कृतीशील प्रतिसादामुळे अल्पावधीत सेवा पूर्ण झाल्या !

प्रत्येक दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, धर्मप्रेमी स्वत:हून येऊन धर्मसभेच्या प्रचाराच्या सेवेविषयी विचारायचे. होर्डिंग, बॅनर, भित्तीपत्रके लावणे, रिक्शांवर पत्रके लावणे या सेवा धर्मप्रेमींनी अल्पावधीत पूर्ण केल्या.

५. स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांचे धर्मसभेच्या प्रसारातील मोलाचे योगदान !

सभेच्या पूर्वी काही संपादक, उपसंपादक आणि मुख्य वार्ताहर यांच्याशी समितीच्या स्थानिक समन्वयकांनी संपर्क साधला. काही संपादकांनी सभेला व्यापक स्तरावर प्रसिद्धी मिळण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सुचवल्या. संपादकांनाही सभेमध्ये स्वत:चे योगदान असले पाहिजे, असे वाटत असल्याने सभेपूर्वी तेथे सभेचा उद्देश आणि सभेची पूर्वसिद्धता यांविषयी माहिती देण्यासाठी २ पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. दोन्ही पत्रकार परिषदांना वृत्तपत्रांतून चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळाली.

सभा उत्कृष्ट होण्यासाठी पत्रकारांचे योगदान आणि पत्रकार परिषदांमधील पत्रकारांचा सहभाग यांमुळे प्रसिद्धीचे नियोजन फलदायी झाले. काही संपादकांनी स्वत:हून कार्यस्थळी येऊन समिती समन्वयकांच्या मुलाखती घेणे, सभेची पूर्वसिद्धतेची वृत्ते लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी पुढाकार घेतला.

या सर्वांच्या योगदानामुळेच लक्षावधी लोकांपर्यंत हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार आणि दिशा पोहोचली. याविषयी ईश्‍वराच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत.

आपतक या स्थानिक वृत्तवाहिनीने स्व:तहून पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्माची सद्यस्थिती आणि हिंदु जनजागृती सभेची आवश्यकता या विषयावर समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांची अर्ध्या घंट्याची मुलाखत घेतली. ती प्रसारित झाल्याने लाखो लोकांपर्यंत सभेपूर्वी विषय पोचवला.

सभेच्या प्रत्येक वृत्ताला स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन वस्तूनिष्ठ पद्धतीने आणि नि:पक्षपातीपणे लोकांपर्यंत विषय पोहोचवला !

६.हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांच्या साधनेतील आधारस्तंभ ठरलेले सद्गुरु नंदकुमार जाधवकाका !

सभेच्या पूर्वप्रसारापासूनच अनेक कार्यकर्ते सद्गुरु काकांना भेटून सेवा आणि साधना यांविषयी मार्गदर्शन घेत होते.  सद्गुरु काकांनी कार्यातील चुका लक्षात आणून दिल्यावर त्या स्वीकारून त्यानुसार कार्यकर्त्यांनी पालटही केला. साधना व्यवस्थित होत नाही, साधनेमध्ये अडचणी येतात, तसेच अन्य आध्यात्मिक अडचणी, आध्यात्मिक उपाय यांविषयीही सर्वांनी सद्गुरु काकांकडून मार्गदर्शन घेऊन लगेचच कृतीला प्रारंभ केला. यावरून सद्गुरु जाधवकाका सनातन संस्था किंवा समिती यांच्या कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित नसून अनेकांसाठी ते साधनेतील आधारस्तंभ झाल्याचे लक्षात आले. संतांच्या मार्गदर्शनाखालीच हिंदु राष्ट्र स्थापनेची मुहुर्तमेढ रोवली जाऊ शकते, हे शिकायला मिळाले.

 

…आणि उत्साहपूर्ण वातावरणात धर्मजागृती सभेस प्रारंभ झाला !

लक्ष आकर्षून घेणारा संस्कृतीरक्षणाचे आवाहन करणारा कक्ष !

सभास्थळी प्रवेश करतांना हिंदु धर्मजागृती सभेसाठी कमान उभाण्यात आली होती. त्याच्या शेजारी महान भारतीय संस्कृती आणि बालसंस्कार हा पारंपरिक वेशातील बालसाधकांचा संस्कृतीरक्षणाचे आवाहन करणारा कक्ष उभारण्यात आला होता.

हिंदुत्वाने भारावलेले स्वागत !

प्रवेशद्वारापाशीच दंडधारी युवक उभे होते. हिंदुत्वाची खूण म्हणून येणार्‍या प्रत्येक युवकाला टिळा लावला गेला. अत्तरदाणीतील सुगंधी पाणी शिंपडून सर्वांचे स्वागत केले गेले. पारंपरिक वेशातील महिला आणि पुरुष येणार्‍या धर्माभिमान्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारापाशीच सिद्ध होते. जय श्रीराम म्हणत एकमेकांना अभिवादन केले जात होते. सभास्थळी थोड्या थोड्या अंतरावर लावलेले भगवे ध्वज आणि वीररसयुक्त पोवाडे यांंमुळे सर्वांमध्ये वीरश्री जागृत झाली.

हिंदु तरुणांकडून ढोलवादनाची सलामी !

सभास्थळी भगवे ध्वज फडकवत आणि हिंदुत्वाच्या घोषणा देत हिंदु तरुणांच्या गटांचे आगमन होत होते. जय भवानी वासुदेव जोशी मित्रमंडळाच्या २१ जणांच्या पथकाने चौकात काही वेळ आधीपासून ढोलवादन चालू केले होते. मान्यवर वक्ते प्रवेशद्वारापासून व्यासपिठावर येईपर्यंत त्यांनी ढोलवादनाची सलामी दिली. मान्यवर वक्ते स्थानापन्न झाले आणि धर्मजागृती सभारूपी धर्मयज्ञाला आरंभ झाला.

वाहतूक पोलीस, श्‍वानपथक आणि बॉम्बशोधकनाशक पथक यांचे सहकार्य लाभले !

शिवतीर्थ चौकातच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस वाहतूक नियंत्रण करत होते. सभास्थळी जाण्यासाठीच्या मार्गावरील वाहतूक सभेच्या वेळेपर्यंत तात्पुरती थांबवण्यात आली होती. सभेसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभा चालू होण्याच्या काही वेळ आधी श्‍वानपथकाने, तसेच बॉम्बशोधकनाशक पथकाने सभास्थळाची, तसेच व्यासपिठाची पाहणी केली.

 

धर्मप्रेमी आणि नागरिक यांचा हिदु धर्मजागृती सभेच्या प्रसारकार्यातील उल्लेखनीय सहभाग !

विवाहासाठी जाणार्‍या व्यापार्‍याने समितीच्या कार्याची धारिका पाहून सभेला येण्याचा निर्णय घेणे

एका व्यापार्‍याला सभेचे निमंत्रण दिल्यावर त्याने विवाहासाठी जायचे असल्याने सभेला येण्यास नकार दिला; मात्र समितीच्या कार्याची धारिका पाहून सभेनंतर विवाहाला जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक मासाला आश्रमासाठी साखर अर्पण देणार असल्याचे सांगितले.

शिवणकाम करणार्‍या व्यक्तीने सभेसाठी २१० भगवे ध्वज विनामूल्य शिवून देणे

सभेसाठी लागणारे भगवे ध्वज शिवून देण्यासाठी शिवणकाम करणार्‍या एका व्यक्तीला संपर्क साधला असता त्यांनी २१० ध्वज विनामूल्य शिवून दिले. त्यांनी कामाला असलेल्या व्यक्तीला हातातील काम बाजूला ठेवून प्रथम ध्वज शिवून देण्यास सांगितले.

साडेपाच वर्षांचा बालसाधक दिवसभर सभेच्या प्रसारकार्यात सहभागी होणे

येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. सोहम बडगुजर (वय साडेपाच वर्षे) पालकांना कोणताही त्रास न देता सलग २ दिवस प्रसारात सहभागी झाला. त्यानेही सर्वांसमवेत आनंदाने सेवा केली.

कापड दुकानदाराने काठ्या साठवणे आणि त्या विनामूल्य देणे

सभेच्या ठिकाणी मैदानात लावण्यात येणार्‍या ध्वज उभारण्यासाठी काठ्या हव्या होत्या. काठ्यांसाठी एका कापड दुकानदाराला विचारले असता त्यांनी ९० काठ्या विनामूल्य दिल्या. या वेळी त्या दुकानदारांनी सांगितले कि, कापड गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणार्‍या या काठ्या आम्ही खर तर फेकून देतो; मात्र काही मासांपासूनच्या काठ्या आम्ही साठवून ठेवल्या होत्या. कदाचित तुमच्या होणार्‍या सभेसाठीच काठ्या साठवल्या गेल्या असाव्यात.

धर्मप्रेमीने नातेवाइकांच्या विवाहपत्रिकेवर धर्मसभेचे निमंत्रण छापणे

सभेनंतर धर्मप्रेमी आशिष गांगवे यांच्या नातेवाइकाचा विवाह होता. विवाहपत्रिकेवर श्री. गांगवे यांनी धर्मसभेचे निमंत्रण छापले.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ कु. रत्ना अत्तरदे यांनी १० दिवसांची सुट्टी काढून सेवा करणे

१ मासापूर्वी समितीच्या कार्याशी जोडलेल्या कु. रत्ना अत्तरदे यांनी प्रचारासाठी १० दिवसांची सुट्टी काढली. साधकांसमवेत वैयक्तिक संपर्क, बैठका ठरवणे अशा प्रकारे त्या प्रसारकार्यात सहभागी झाल्या. अल्प कालावधीत त्यांनी सर्वांशी जवळीक साधली. परिचयातील लोकांनाही त्यांनी धर्मकार्यासाठी अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यांच्या भागातील नागरिकांना सभेला येण्यासाठी स्वखर्चाने गाडी ठरवली.

पैसे उसने घेऊन धर्मदान करणारी वृद्ध महिला

एका वृद्ध महिलेने पैसे उसने घेऊन अर्पण दिले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्याकडे त्या वेळी अर्पण देण्यासाठी पैसे नव्हते; म्हणून त्यांनी शेजारच्या एका बाईकडे अर्पण करण्यासाठी पैसे मागितले. त्या बाईने नकार दिल्यानंतर त्यांनी दुसर्‍या घरात जाऊन पैसे घेऊन २० रुपये अर्पण दिले.

भाजी विनामूल्य देणे

प्रचाराला आलेल्या साधकांसाठी लागणारी भाजी येथील भाजी विक्रेत्यांनी विनामूल्य दिली, महाप्रसादाचेे अन्य साहित्यही विनामूल्य दिले.

जळगाव जिल्हा फोटो असोसिएशन यांनी सभेचे
चित्रीकरण करून प्रचारासाठी विनामूल्य ध्वनीचित्रफीत सिद्ध करून देणे

येथील धर्मप्रेमी आणि जिल्हा फोटो असोसिएशनचे सदस्य श्री. सागर सपकाळे यांनी त्यांच्या संघटनेच्या कार्यक्रमात सभेचा विषय सांगण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केले. विषय ऐकून संघटनेचे कार्यकर्ते प्रभावित झाले. असोसिएशनने सभेपूर्वी झालेली वाहनफेरी यांची सभेच्या प्रचारासाठी ध्वनीचित्रफीत सिद्ध करून दिली. ध्वनीचित्रफीतीमुळे व्हॉट्सअ‍ॅप वरून सभेचा प्रभावी प्रचार झाला. धर्मसभेचेही विनामूल्य चित्रीकरण आणि छायाचित्र काढून पुढील प्रचारासाठी सभेची ध्वनीचित्रफीत असोसिएशनद्वारे करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही सहकार्य करणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

रिक्शाचालकांनी अत्यल्प भाडे घेऊन सभेचा प्रचार करणे

२ रिक्शाचालकांनी ४ दिवस अत्यल्प भाड्यात रिक्शाद्वारे उद्घोषणा केली.

एका रात्रीत ४० धर्मप्रेमींनी ८० बॅनर लावणे

४० धर्मप्रेमींनी एका रात्रीत शहर आणि ग्रामीण भागात सभेचे ८० बॅनर लावले.

प्रचारासाठी गावात सभेचे आयोजन करणारे शिरसोली येथील विजय पाटील

शिरसोली येथील धर्मप्रेमी विजय पाटील यांनी गावातील युवकांचे संघटन करून धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केले. या सभेला गावातील ३५० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. गावातील धर्मप्रेमींना सभेसाठी येण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गाडीचे नियोजन केले होते.

भित्तीपत्रके आणि बॅनर लावण्यात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

विविध स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ३०-४० कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शहरात १ सहस्र भित्तीपत्रके आणि १०० छोटे बॅनर ३ दिवसांत लावले. यामुळे शहरात सभेची वातावरणनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाली.

३०-४० धर्मप्रेमींचा सेवेत प्रत्यक्ष सहभाग

सभेपूर्वी येथील ३०-४० धर्मप्रेमी युवक सभेच्या मैदानावर सेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मैदान स्वच्छता, आखणी, कनात लावणे, प्रदर्शन लावणे, व्यासपीठ उभारणी, मैदानाची सुरक्षा आदी मैदानावरील सेवेत सहभागी झाले होते. सभेनंतर आवरण्याच्या सेवेतही त्यांनी सहभाग घेतला.

 

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती
समिती यांच्या कार्यामागील दैवी कृपेचा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना आलेला अनुभव !

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून जामिनावर सुटलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी प्रथमच जळगावच्या हिंदु धर्मजागृती सभेत व्यासपिठावरून हिंदूंना संबोधित केले. सभेपूर्वी गावोगावी जाऊन सभेचा प्रचार करण्याच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सभेच्या माध्यमातून त्यांनी प्रथमच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य प्रत्यक्ष जवळून अनुभवले.

जळगाव सभेत सहभागी झालो !

एका प्रसंगानंतर माझी सनातनच्या साधकांसमवेत ओळख झाली. त्यांच्याकडून मला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. मी जप-साधना करू लागलो. तेव्हापासून मला संस्थेचे कार्य जवळून पहाण्याची उत्सुकता होती. योगायोगाने १९ नोव्हेंबरला जळगावच्या सभेत मी सहभागी झालो आणि समितीचे कार्य मला जवळून पहाता आले.

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांच्यातील विविध गुणांचे दर्शन झाले !

जळगाव येथे आल्यावर साधकांसमवेत काही बैठकांमध्ये सहभागी झालो. सेवेसाठी उत्सुक असणारे साधक मला पहायला मिळाले. समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांमध्ये सेवाभाव, स्वयंशिस्त, नियमबद्ध आणि प्रेमभाव अनुभवता आला. पूर्वी समाजकार्य करतांना भरपूर बैठका, त्यांचे नियोजन, सभांचे नियोजन आणि कार्यकर्ते पाहिले आहेत; मात्र अशी सभा, कार्यकर्ते (साधक), सुनियोजित कार्यपद्धती, निरपेक्ष प्रेम मी प्रथमच पाहिले. कोणतीही तक्रार किंवा खंत व्यक्त न करता रात्रभर सेवेत व्यस्त असलेले साधक मी बघितले. साधकांनी केलेले नियोजन आणि वक्तृत्वशैली मला कुठेही बघायला मिळालेली नाही.

सहजता : समितीचे पदाधिकारी, सनातनचे संत आणि ज्येष्ठ साधक यांना सहजतेने ओळखता येत नाही; कारण ते प्रत्येक साधकामध्ये सहजपणे मिसळून असतात. स्वभाव आणि त्यांची कृती यामुळेच साधक ओळखता येतात.

प्रार्थनेमुळेच सभेच्या व्यासपिठावरून बोलता आले !

जळगाव येथील सभेत प्रथमच मी एवढ्या मोठ्या व्यासपिठावरून बोललो. मी बोलेन, याविषयी मला आत्मविश्‍वास नव्हता; मात्र सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना केल्यावर हे शक्य झाले.

माझ्या असे लक्षात आले की, दैवी कृपेविना असे होणे शक्य नाही. कुणीतरी सूक्ष्म दैवी शक्ती मागे उभी आहे. तीच सर्व सेवा किंवा कार्य करून घेते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सभेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यासाठी त्यांच्या आणि श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. सुधाकर चतुर्वेदी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

धर्मसभेतील भाषणात हिंदूंचे क्षात्रतेज जागृत करणारी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी म्हटलेली स्वरचित कविता…

ऊठो हिंदुओ करो सिद्धता । हिंदु राष्ट्र निर्माण की ।

दु:शासन की तोड भुजायें । पांचाली का शोक हरेंगे ।

काट शिराये ऊन दुष्टोंकी । हिंदु राष्ट्र आगाज करेंगे ॥

हमने पहचाना है उनको । जो समाज को तोड रहे ।

भारतीय चिंतन की धारा । छल बल से जो मोड रहे ॥

ऊठो हिंदुओ करो सिद्धता । हिंदु राष्ट्र निर्माण की ।

जय बजरंगी करो गर्जना । जय बोलो श्रीराम की ॥

आज हिमालय की चोटीसे । भगवा ध्वज लहरायेगा ।

जाग उठा है हिंदू फिरसे । हिंदु राष्ट्र बनायेगा ॥

शिव तो जगे, किंतु देश का । शक्ती जागरण शेष है ।

देव जुटे यत्नोमें अपितु । असूर निवारण शेष है ॥

 

राष्ट्र आणि धर्म रक्षणाची धगधगती ज्वाला सर्वांच्या हृदयात निर्माण करणारी हिंदु धर्मजागृती सभा !

प्रत्येक घरातील हिंदूने समितीच्या कार्यात सहभाग घ्यावा !  – श्री कृष्णाजी महाराज, वैष्णव संप्रदाय

हिंदु जनजागृती करत असलेले धर्मकार्य हिंदूंमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक घरातील एक तरी हिंदू समितीच्या कार्यात असायला हवा.

धर्मजागृती सभा प्रत्येक गावात व्हायला हवी ! – सौ. वंदना पाटील, महिलाध्यक्षा, अखिल भारतीय छावा संघटना, उत्तर महाराष्ट्र

अशी सभा प्रत्येक गावात व्हावी. सर्व हिंदूंनी संघटित होऊन एकतेने धर्म,  गोमाता आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी घराघरांत छत्रपती शिवाजी महाराज सिद्ध व्हायला हवेत. (छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी महिलांनी स्वत: धर्मशिक्षण घेऊन पाल्यांवर संस्कारित आवश्यक आहे. – संपादक)

हिंदु जनजागृती समिती म्हणजे चालते बोलते विद्यापीठच ! – श्री. पुरुषोत्तम शुक्ल आणि ह.भ.प. देवदत्त मोरदे

हिंदु जनजागृती समिती म्हणजे हिंदूंना स्वाभिमान, धर्माचरण आणि भगवंतावरील विश्‍वास दृढ करून देणारे एक चालते बोलते विद्यापीठच होय. हिंदूंना आलेली मरगळ घालवून टाकण्यासाठी आलेली ही सुवर्णसंधी प्रतीवर्षी प्रभु श्रीरामांच्या कृपेने प्राप्त होते. ती अशीच नेहमी प्राप्त होवो. सर्वांचा धर्मावरचा विश्‍वास वाढो, हीच सदिच्छा  !

श्री. कैलास सोनवणे, माजी नगरसेवक – हिंदु जनजागृती सभांद्वारे होणारे हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे.

अधिवक्ता मिलिंद बडगुजर, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा बार असोसिएशन – हिंदु जनजागृती समितीच्या सभेतील वक्यांची भाषणे पुष्कळ प्रेरणादायी होती.

 

उपस्थित मान्यवर

भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे (राजूमामा), शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. शाम कोगटा, महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते सुनील माळी, मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती सौ. ज्योती चव्हाण, माजी नगरसेवक श्री. कैलास सोनवणे, माजी नगरसेवक श्री. मनोज चौधरी, नगरसेविका सौ. शीतल चौधरी, नगरसेवक श्री. नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे श्री. गजानन मालपुरे, शिवसेना महिला आघाडीच्या सौ. मंगला बारी, सौ. शोभा चौधरी, भाजपच्या जिल्हा चिटणीस वंदना पाटील, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत खटोड, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. ललीत चौधरी, प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. संजीव हुजुरबाजार, डॉ. (सौ.) आरती हुजुरबाजार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे श्री. दीपक जोशी, श्री. सचिन नारळे, माजी नगराध्यक्ष श्री. के.डी.पाटील, नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. अजय गांधी, फुकणी येथील सरपंच श्री. कमलाकर पाटील, जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता आर्.आर्.महाजन, उपाध्यक्ष अधिवक्ता मिलिंद बडगुजर, प्रसिद्ध व्यावसायिक श्री. अनिल कासट

मान्यवरांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

सभांमुळे युवकांमध्ये धर्मभावना वाढली ! – ह.भ.प. अमोल महाराज पाटील, तालुकाध्यक्ष, वारकरी महामंडळ

हिंदु धर्मजागृती सभांमुळे युवकांमध्ये धर्मभावना वाढीस लागत आहे. याविषयी जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास मी सिद्ध आहे.

 

देश बदल रहा है…हिन्दु राष्ट्र की ओर बढ रहा है…

धर्मकार्याला प्रसिद्धी देणे, हे आमचे कर्तव्य ! – आनंद शर्मा, संपादक, आप तक वृत्तवाहिनी

तुम्ही पूर्णवेळ धर्मकार्य करता. आमच्या परीने या कार्याला प्रसिद्धी देणे, हे आमचे कर्तव्य आहे. मीही हिंदू आहे. धर्मसभेत सांगितल्याप्रमाणे धर्मशिक्षणाचा प्रसार हिंदूंपर्यंत पोहोचायला हवा. धर्मकार्याला प्रसिद्धी देणे, हे आमचे कर्तव्यच आहे, असे मत आप तक वृत्तवाहिनीचे संपादक श्री. आनंद शर्मा यांनी व्यक्त केले. श्री. आनंद शर्मा यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीवरून नियमित धर्मशिक्षणाच्या ध्वनीचित्रफीती दाखवण्याची सिद्धता दर्शवली. सभेनंतर चांगली प्रसिद्धी दिलेल्या प्रसारमाध्यमांचे संपादक आणि प्रतिनिधी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले. एका वृत्तपत्राच्या संपादकांनी समितीच्या संपर्कयंत्रणेचे कौतुक केले, तसेच वृत्तपत्रांतून नियमित धर्मशिक्षणाची चौकट प्रसिद्ध करण्याची सिद्धता दर्शवली.

 

सभेत सहभागी झालेल्या संघटना

विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आदर्श मित्र मंडळ, स्वराज्य निर्माण सेना, मेस्को मात नगर, जय भवानी मित्र मंडळ, शिवाजी चौक मित्र मंडळ, आई भवानी मित्र मंडळ, जय श्रीराम ग्रुप, शिवराय मित्र मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, शिवप्रेमी मित्र मंडळ, गोल्डन ग्रुप, बजरंग दल (जळगाव), मारुति पेठ मित्र मंडळ, जय सावता मित्र मंडळ, तरुण कुढापा मित्र मंडळ, सुवर्ण मित्र मंडळ, झुंझार बहुउद्देशीय मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, बजरंग मित्र मंडळ, एसीएससी मित्र मंडळ, रथ चौक मित्र मंडळ, श्रीराम ग्रुप, नवदुर्गा मित्र मंडळ, शनी नगर मित्र मंडळ, शिवाजी नगर मित्र मंडळ, वाल्मिक मित्र मंडळ, सार्वजनिक मित्र मंडळ, एकता गणेश मंडळ, शिवझेप प्रतिष्ठान, महर्षि वाल्मिक मित्र मंडळ, रामराज्य मित्र मंडळ, जय मायक्का मित्र मंडळ, तरुण मराठा मित्र मंडळ, विश्‍व संघर्ष टीम, छत्रपती ग्रुप, तिरंगा मित्र मंडळ, ॐ साईराम प्रतिष्ठान, विक्रमादित्य ग्रुप, जय बजरंग व्यायामशाळा, नवतरुण मित्र मंडळ, पांचालेश्‍वर मित्र मंडळ

 

राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी यांचा उत्साहपूर्ण सहभाग

१. खेडी येथील शिवराज्य मित्रमंडळ आणि तरुण मराठा मित्रमंडळ यांचे ५० हून अधिक कार्यकर्ते जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् । असे लिहिलेले टी-शर्ट परिधान करून सभास्थळी आले होते.

२. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नांद्रा येथील महिलांनी गावात मद्यबंदी केली होती. तेथील महिला मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होत्या. जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणा देतच त्या सभास्थळी आल्या.

३. अयोध्यानगर येथील धर्माभिमानी युवक अयोध्यानगरापासून सभास्थळापर्यंत मशाल घेऊन आले.

४. ११२ कि.मी. अंतरावरून धर्माभिमानी सभेला आले !  सभेच्या प्रसारासाठी सामाजिक संकेतस्थळांवरून पाठवण्यात आलेल्या पोस्ट पाहून जळगावला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून (जळगावपासून ११२ कि.मी. अंतरावर) १० धर्मप्रेमी पुरुष आणि २ महिला सभेसाठी आल्या होत्या. नांदुरा येथेही अशा प्रकारची सभा आयोजित करण्याची सिद्धता दर्शवली.

५. तांबापूर (मेहरूण) येथील ५० धर्मप्रेमी युवकांनी त्यांच्या परिसरात वाहनफेरी काढली. सभास्थळीही ते वाहनफेरी काढून घोषणा देत आले.

६. धर्मसभेची व्यासपीठ उभारणी, मैदान आखणी, कक्ष उभारणी, धर्मसभा झाल्यानंतर आवराआवर या सेवांमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

७. आमदार सुरेश भोळे हे धर्मसभेला पूर्णवेळ उपस्थित होते. धर्मसभेनंतर साहित्य आवरण्याच्या धर्मसेवेतही त्यांनी काही वेळ सहभाग घेतला.

८. बालसंस्कार कक्षावर घोषणा देणार्‍या बालसाधकांचे अनेक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी कौतुकाने चित्रीकरण केले.

९. जळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता आर्.आर्. महाजन, उपाध्यक्ष अधिवक्ता मिलिंद बडगुजर यांच्यासह ८-१० अधिवक्त्यांनी सभेनंतर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची भेट घेतली.

 

सभेच्या प्रसाराच्या कालावधीत आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव

सनातनच्या सुगंधामुळे सनातनचे साधक आल्याचे एका महिलेला वाटले !

एका घरातून एका महिलेने येऊन विचारले, तुम्ही सनातनचे साधक आहात का ? त्यांना हो असे म्हटल्यावर त्यांनी सनातनचा सुगंध येत आहे, असे म्हटले. प.पू. भक्तराज महाराज आमच्या घरी आले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

दोन महिलांनी सनातनच्या पंचांगाचा सुगंध अनुभवला !

धर्मसभेच्या प्रचाराला जातांना आम्ही सनातन पंचांग समवेत घेऊन गेलो. एक महिला पुनःपुन्हा पंचांगाचा सुगंध घेत होती. तिने सांगितले, पंचांगाला वेगळाच सुगंध येत आहे. दुसर्‍या ठिकाणी एका महिलेला सभेचे निमंत्रण दिल्यावर त्यांनीही सुगंध येत असल्याचे सांगितले. त्यांना सनातन पंचांग दाखवल्यावर त्यांनी हाच सुगंध येत होता, असे सांगितले.

पुरुष असतांना महिलांना धर्मप्रचार करावा लागतो, असे सांगून रिक्शाचालकाने अर्पण देणे

काही साधिका धर्मसभेचा प्रचार करत असतांना एक रिक्शाचालक प्रवाशांची वाहतूक करत असतांना थांबला आणि साधिकांना सांगितले, आम्ही पुरुष असतांना महिलांना धर्मप्रचार करावा लागतो. असे म्हणून त्याने पैसे अर्पणपेटीत घातलेे.

 

हिंदु राष्ट्र संघटक बनून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यात झोकून देणार !

सभेनंतरच्या आढावा बैठकीत धर्मप्रेमींचा निर्धार !

जळगाव – येथे १९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेनंतर येथील गायत्री मंदिरात धर्मजागृती सभेच्या आढावा बैठकीचे आयोजन हिंदु जनजागृती समितीने केले होते. बैठकीतील हिंदुप्रेमींनी धर्मशिक्षण वर्ग आणि स्वसरंक्षण प्रशिक्षण वर्ग, सामाजिक संकेतस्थळाद्वारे सेवा करणे, दैनिक सनातन प्रभातच्या अंकाचे वर्गणीदार होऊन इतरांना वर्गणीदार करणे, आपापल्या भागात फलकप्रसिद्धी करणे अशा उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. यापुढे हिंदु राष्ट्र संघटक बनून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यात झोकून देण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.

बैठकीला सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी, सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे, समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.

विशाल संघटन निर्माण करा ! – श्री. सुनील घनवट

मुसलमानांप्रमाणे आपणही संघटित होऊन विशाल संघटन निर्माण केले पाहिजे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. यासाठी संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल.

धर्मक्रांतीसाठी आध्यात्मिक बळही हवे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

धर्मक्रांतीसाठी शारीरिक बळासमवेत आध्यात्मिक बळही आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिदिन धर्माचरण, नामजप, साधना करून देवाचे बळ प्राप्त करणे अपक्षित आहे.

वैशिष्ट्यपूर्ण

१. अनेक धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे धर्मकार्यात काय योगदान देणार, याविषयी सांगितले.

२. श्री. किशोर चाटे यांनी प्रतिदिन १ घंटा धर्मकार्यासाठी देणार असल्याचे सांगितले.

३. सप्ताहातून एकदा प्रत्येक रविवारी सायंकाळी ७ वाजता सर्वांनी गायत्री मंदिरात एकत्र येण्याचे निश्‍चित केले असून तेथे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आणि धर्मशिक्षण वर्ग यांना येण्याची सिद्धता प्रत्येकाने दर्शवली. बैठकीच्या आयोजनाचे सर्व दायित्व धर्मप्रेमींच्या एका गटाने घेतले, तसेच बैठकीला येण्याचे निरोप अधिकाधिक धर्मप्रेमींना देण्याचे दायित्व श्री. विशाल पवार या धर्मप्रेमीने घेतले.

 

लक्षावधी लोकांनी घेतला सभेचा लाभ !

१ लाख २१ सहस्र धर्मप्रेमींनी फेसबुक लाईव्हद्वारे सभा पाहिली !

देश बदल रहा है, हिंदु राष्ट्र की ओर बढ रहा है, हे घोषवाक्याने सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्मसभेचा व्यापक प्रसार करण्यात आला. धर्मसभेच्या जनजागृतीविषयक व्हॉट्सअ‍ॅप पोस्टसह चलचित्रांद्वारे प्रसार करण्यात आला. सभेच्या फेसबूक लाईव्ह प्रक्षेपण सभा संपेपर्यंत १ लाख २१ सहस्र धर्मप्रेमींनी पाहिले.

जर्मनी आणि अमेरिका येथील धर्मप्रेमींनी फेसबुक लाईव्ह द्वारे पाहिली सभा

फेसबूकद्वारे करण्यात आलेल्या सभेचे प्रक्षेपण जर्मनी आणि बोस्टन (अमेरिका) येथील धर्मप्रेमींनी पाहिले आणि त्यांनीही धर्मकार्यात सहभाग नोंदवण्याची इच्छा व्यक्त केली.

सभेत प्रथमच घेण्यात आलेल्या ऑनलाईन अभिप्रायामध्ये २०० जणांनी मते नोंदवली !

समितीच्या धर्मसभेत प्रथमच सभास्थळी ऑनलाईन अभिप्राय घेण्यात आले. यामध्ये sabha आणि Hightek१ या स्थळावर अर्ज भरून स्वत:चा अभिप्राय नोंदवायचा होता. त्यामध्ये २०० धर्मप्रेमींनी अभिप्राय नोंदवला.

सभेनंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीने अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. सुधाकर चतुर्वेदी आणि श्री. प्रशांत जुवेकर यांची मुलाखत घेतली.

 

राष्ट्रकार्याला व्यापक प्रसिद्धी देणार्‍या या सर्व वृत्तपत्रांचे आभार !

धर्मसभेच्या अनुषंगाने समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदा, प्रसिद्धीपत्रक, वाहनफेरी, तसेच प्रत्यक्ष धर्मजागृती सभा यांच्या वृत्तांना जळगाव येथील सर्वच प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिली. सभा यशस्वी होण्यामध्ये येथील प्रसारमाध्यमांचा वाटा मोलाचा ठरला !

चांगली प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे

दैनिक लोकमत, दैनिक दिव्य मराठी, दैनिक देशदूत, दैनिक देशोन्नती, (राष्ट्र आणि धर्म कार्याला व्यापक प्रसिद्धी देऊन लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याचे खर्‍या अर्थाने दाखवून देणार्‍या जळगाव येथील प्रसिद्धीमाध्यमांची कृती सर्वत्रच्या प्रसारमाध्यमांसाठी अनुकरणीय आहे. – संपादक) दैनिक पुण्यनगरी, दैनिक सकाळ, दैनिक जनशक्ती, दैनिक तरुण भारत, दैनिक साईमत, साप्ताहिक केसराज

मध्यम प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे

दैनिक भास्कर, दैनिक सामना, दैनिक नजरकैद

सभेचे थेट प्रक्षेपण करणार्‍या आणि चांगली प्रसिद्धी देणार्‍या वृत्तवाहिन्या

आप तक, ईबीएन न्यूज, मी महाराष्ट्र

सभेला चांगली प्रसिद्धी देणार्‍या वृत्तवाहिन्या

स्टार माझा, साम टीव्ही

(राष्ट्र आणि धर्म कार्याला व्यापक प्रसिद्धी देऊन लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याचे खर्‍या अर्थाने दाखवून देणार्‍या जळगाव येथील प्रसिद्धीमाध्यमांची कृती सर्वत्रच्या प्रसारमाध्यमांसाठी अनुकरणीय आहे. – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात