चित्रपटातून चालणारा ‘चित्रपट जिहाद’ संपवण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी एकवटून वैध मार्गाने विरोध करावा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव सनातन संस्था

जळगावमध्येच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात पद्मावती चित्रपट
प्रदर्शित होऊ न देण्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आंदोलनाद्वारे निर्धार

• आंदोलनात ५१ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा तसेच सनातन संस्थेचा सहभाग 

• संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात जळगाव येथे तक्रार प्रविष्ट

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करताना हिंदुत्वनिष्ठ

महाराष्ट्रात ‘पद्मावती’ प्रदर्शित झाल्यास हिंदु समाज रस्त्यावर उतरेल ! – आमदार सुरेश भोळे

जळगाव – चित्रपटाच्या माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. याविषयी १६ नोव्हेंबरला मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊच नये, अशी विनंती केली आहे. पद्मावती चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. जळगाव शहरात हा चित्रपट चालू देणार नाही. आता हिंदु समाज संघटित झाला असून महाराष्ट्रात पद्मावती प्रदर्शित झाल्यास हिंदु समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करील, अशी चेतावणी भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिली. या वेळी ‘पद्मावती चित्रपटावर समस्त हिंदूंनी बहिष्कार घालावा’, असे आवाहन आमदार श्री. सुरेश भोळे यांनी केले. २५ नोव्हेंबर या दिवशी महानगरपालिकेच्या इमारतीसमोर पद्मावती चित्रपटाच्या विरोधात घेण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एकवटलेल्या ५१ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पद्मावती चित्रपटाला जोरदार विरोध केला. केवळ जळगावमध्येच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा निर्धार या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केला.

या आंदोलनानंतर शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगरप्रमुख श्री. मोहन तिवारी यांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तक्रार स्वीकारली.

चित्रपटातून चालणारा ‘चित्रपट जिहाद’ संपवण्यासाठी समस्त
हिंदुत्वनिष्ठांनी एकवटून वैध मार्गाने विरोध करावा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

राणी पद्मावती किती महान होत्या, हे पैशांसाठी हपापलेले चित्रपटातील अभिनेते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना काय कळणार ? गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असून हिंदुत्वाच्या पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रातही समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या भावना लक्षात घेऊन या चित्रपटावर बंदी घालावी. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद याप्रमाणे पद्मावतीसारख्या चित्रपटातून चालणारा ‘चित्रपट जिहाद’ संपवण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी एकवटून वैध मार्गाने विरोध करावा.

शहरात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – सुरेश भोळे, आमदार

जळगाव शहरात हा चित्रपट चालू देणार नाही. हिंदु समाज संघटित झाला असून या चित्रपटाचा रस्त्यावर उतरून निषेध करण्यात येईल.१६ नोव्हेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करू नये,या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या चित्रपटावर सर्व हिंदूंनी बहिष्कार टाकावा !

हे सरकार मोगलांचे आहे का ? अन्यथा होणार्‍या परिस्थितीला
फडणवीस सरकार उत्तरदायी ! – महेंद्रसिंह पाटील, अखिल भारतीय राजपूत महासभा, जळगाव

हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र असून राणी पद्मावतीचा अवमान हिंदु समाज खपवून घेणार नाही. हे शासन हिंदूंचे आहे कि मोगलांचे? ५ राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बंदी झालीच पाहिजे. अन्यथा पुढे निर्माण होणार्‍या परिस्थितीला फडणवीस सरकार उत्तरदायी राहील. जळगावात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाहीच; पण अन्य राज्यातही प्रदर्शित होऊ देणार नाही.

इतिहास, देवता, प्रथा, परंपरा यांचा अवमान करणार्‍या चित्रपटांना संघटितपणे विरोध करा ! – सुनील घनवट

५१ संघटनांच्या भव्य आंदोलनामुळे शासनाला या चित्रपटाविरोधात कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कला स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना हिंदू सहन करणार नाहीत. इतिहास, देवता, प्रथा, परंपराचा अवमान करणार्‍या चित्रपटांना संघटितपणे विरोध करा. सेन्सॉर बोर्डाची अनुमती नसतांना चित्रपटाचा ट्रेलर कसा ‘रिलीज’ केला ? या ट्रेलरमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून याप्रकरणी भन्साळींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा !

जळगाव आंदोलनात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

पद्मावती प्रदर्शित झाल्यास उद्भवणार्‍या परिस्थितीला सरकार उत्तरदायी असेल ! – महेंद्रसिंह पाटील, अखिल भारतीय राजपूत महासभा, जळगाव

पद्मावती चित्रपटातून हिंदु धर्माला अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र हिंदु समाज खपवून घेणार नाही. हे शासन हिंदूंचे आहे कि मोगलांचे ? ५ राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बंदी झालीच पाहिजे. अन्यथा पुढे निर्माण होणार्‍या परिस्थितीला फडणवीस सरकार उत्तरदायी राहील.

चित्रपटांतून होणारा हिंदूंचा इतिहास आणि वीरांगना यांचा अवमान सहन करणार नाही ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

इतिहास, देवता, प्रथा, परंपरा यांचा अवमान करणार्‍या चित्रपटांना संघटितपणे विरोध करायला हवा. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दाखवल्याविना हा चित्रपट प्रदर्शित करू नये. कन्हैयाकुमार बोलतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मकबूल फिदा हुसैन म्हणतो, कला स्वातंत्र्य यांतून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान चालूच आहे. तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या घरात ठेवा. अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांतून होणारा हिंदूंचा इतिहास आणि वीरांगणा यांचा अवमान सहन करणार नाही.

स्त्रियांचे चारित्र्य हनन होत असतांना तृप्ती देसाई कुठे आहेत ? – मोहन तिवारी

जलती रही जोहर मेवाडिया । भेडिये फिर भी मौन थे ।

हमे पढाया गया अकबर महान । तो फिर महाराणा प्रताप कौन थे ॥

हिंदूंवरील या षड्यंत्राला हाणून पाडण्यात येईल. भारतीय स्त्रियांचा अवमान होत असतांना तथाकथित स्त्रियांच्या हक्काविषयी बोलणार्‍या तृप्ती देसाई कोणत्या बिळात लपून बसल्या आहेत ?

भारताच्या तेजस्वी इतिहासाचे विकृतीकरण कदापी सहन करणार नाही ! – अधिवक्ता संजयसिंग पाटील, बार कौन्सिल, जळगाव

जिवाची पर्वा न करता जौहार करणार्‍या भारतीय स्त्रियांचा अवमान हिंदु समाज सहन करणार नाही. हा इतिहास लोकांची दिशाभूल करणारा असून भन्साळी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा.

भन्साळी यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार पुन्हा घेण्यात यावा !- सौ. क्षिप्रा जुवेकर, रणरागिणी

शौर्यवान राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई, पद्मावती यांचा अवमान करण्याचे बॉलिवूडचे षड्यंत्र आहे. शील रक्षणासाठी जौहार करणार्‍या राणी पद्मावतीचा अवमान हिंदु समाज कदापी सहन करणार नाही. भन्साळी यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार पुन्हा घेण्यात यावा.

आक्रमकांचा उदोउदो करणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता गोविंद तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा

सेन्सॉर बोर्डाची अनुमती नसतांना पद्मावती चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार्‍या भन्साळी यांच्या कायदेशीर कारवाई व्हायला हवी. मोगल आक्रमकांचा उदो-उदो करणार्‍या भन्साळी यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही.

 

जळगाव येथे संजय भन्साळी विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद

सेन्सॉर बोर्डाची परवानगी न घेता परस्पर चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित करून राणी पद्मावतीचा अवमान करणार्‍या संजय भन्साळी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रविष्ट व्हावा यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांना तक्रारदार श्री. मोहन तिवारी आज निवेदन दिले.

पोलीस निरीक्षकांना तक्रार देतांना (१) सद्गुरु नंदकुमार जाधव (२) आमदार श्री. सुरेळ भोळे, (३) श्री. मोहन तिवारी यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ

जळगाव येथे पद्मावती चित्रपटाच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होणार्‍या ५१ संघटना !

हिंदू महासभा, श्रमजिवी कामगार ऑटो रिक्शा फेडरेशन, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराणा प्रताप क्रांतीदल, जळगाव जिल्हा वकिल संघ, वारकरी संप्रदाय, विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वराज्य निर्माण सेना, शिवसेना, शिवसेना महिला शाखा, शिवसेना युवासेना, भाजप, योग वेदांत सेवा समिती, सिंधू सेना, श्रीराम महोत्सव समिती, बहुभाषिक ब्राह्मण संघ, बारा बलुतेदार संघटना, शिवाजीनगर मित्र मंडळ, वीर शिवा काशीद प्रतिष्ठान, शिवसेना ग्राहक मंच, अखिल भारतीय नरेंद्र मोदी महासंघ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती, भुसावळ, जीएमथ्री ग्रुप, गायत्री माता मंदिर संस्था, शिवबा प्रतिष्ठान, शिवराज्य मित्र मंडळ खेडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जेपीपी अहिंसा रिर्सच सेंटर, जय मातादी ग्रुप, वासुदेव जोशी बहुउद्देशीय संस्था, जय श्रीराम ग्रुप, हुप (पहेलवान) ग्रुप, जय मल्हार ग्रुप, जय भवानी ग्रुप, जय लेवा ग्रुप, शिवराज्य मित्र मंडळ (शिरसोली), जय मायक्का देवी मंदिर संस्थान, राजपूत युवा फाऊन्डेशन, शिवतांडव ढोल पथक, मोरया ग्रुप (नांद्रा), छावा संघटना, क्रांतीसूर्य महाराणा प्रताप पुतळा समिती, रामराज्य ग्रुप, दुर्गा वाहिनी, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, हिंदु विधिज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती आदी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात