शिवप्रतापदिनानिमित्त लिंब (जिल्हा सातारा) येथे ‘हिंदु धर्मरक्षण आणि राष्ट्रजागृती’ या विषयावर सनातन संस्थेचे मार्गदर्शन

लिंब (जिल्हा सातारा)  – येथे पंचक्रोशीतील शिवप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने २६ नोव्हेंबरला शिवप्रतापदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास पंचक्रोशीतील शिवरायप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

१. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक आणि पूजा, तर सायंकाळी साडेपाच वाजता पालखी आणि मिरवणूक काढण्यात येणार आहे.

२. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ७ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांचे ‘हिंदु धर्मरक्षण आणि राष्ट्रजागृती’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर शिवभूषण श्री. रोहिदास हांडे शिवचरित्राविषयी माहिती देणार आहेत.

३. कार्यक्रमस्थळी क्रांतिकारकांची माहिती देणारे प्रदर्शन आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ तसेच सात्त्विक उत्पादनांचा कक्ष असणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात