सांताक्रूझ (मुंबई),दहिसर मोरी (डोंबिवली),यवतमाळ येथे सनातन प्रभातच्या वाचकांसाठी वाचक मेळावे !

मेळाव्याला उपस्थित वाचक

मुंबई – सांताक्रूझ (पू.) येथील साईबाबा मंदिरात ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे साधक श्री. भरत कडूकर यांनी ‘देशातील विविध वृत्तपत्रांतून हिंदुद्वेष पसरवला जात आहे; मात्र आता ‘सनातन प्रभात’मुळे समीकरण पालटत आहे आणि समाजाला वस्तूस्थिती कळत आहे’, असे मार्गदर्शन केले. सनातनच्या साधिका सौ. मनाली नाईक यांनी उपस्थितांना ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ याविषयी सांगितले. उपस्थित वाचकांनी धर्मकार्यात कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

वाचकांचे विचार

सनातन प्रभातमुळे हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात आले ! – सौ. प्रतिभा घावरे, अध्यक्ष, श्री समर्थ कृपा महिला मंडळ

आमच्या इमारतीमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यावर इमारतीमध्ये सकारात्मक स्पंदने जाणवू लागली आणि इमारतीमधील वादविवाद अन् भांडणे न्यून झाली. ‘सनातन प्रभात’मुळे आम्हाला जगात हिंदु धर्मावर होणारे आघात समजले आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्वही लक्षात आले.

सनातन प्रभात साधनेचे महत्त्व सांगते ! – गवस

आपत्काळ कठीण असल्याने सनातन प्रभातच्या माध्यमातून साधनेचे महत्त्व सांगितले जाते. आपण सर्वांनी धर्मासाठी एकत्र येऊन धर्माचरण केल्यास धर्म आपल्याला ऊर्जा, शक्ती, चैतन्य देऊन आपले रक्षण करील.

सनातन प्रभातमुळे आंदोलनात सहभागी होता आले ! – सौ. शलाका शिर्सेकर

सनातन प्रभातमुळे देशातील हिंदूंची स्थिती समजली. त्यांच्यावर होणार्‍या अन्यायासाठी आंदोलनात सहभागी होता आले.

 

दहिसर मोरी (डोंबिवली) (जिल्हा ठाणे) येथे वाचक मेळावा पार पडला

सौ. वेदिका पालन यांचे मार्गदर्शन ऐकतांना उपस्थित वाचक

डोंबिवली – लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र चालू केले, ते स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ! सनातन संस्थेने ही नियतकालिके चालू केली, ती हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या हेतूने, असे वक्तव्य श्री. अजय संभूस यांनी मेळाव्याचा उद्देश सांगतांना केले. डोंबिवली येथील दहिसर मोरी या गावात सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल पालेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी मार्गदर्शन केले.

 

क्षणचित्रे

१. वाचकांच्या गटचर्चेत सर्वांनी मिळून धर्मजागृती सभा घेण्याचे ठरले.

२. दहिसर येथे दत्तजयंतीला ग्रंथप्रदर्शन आणि प्रवचन यांचे नियोजन करण्यात आले.

३. ‘गावागावात प्रचार करण्यासाठी आम्ही वेळ देऊ’, असे उपस्थित वाचकांनी सांगितले. (कृतीशील होऊ इच्छिणारे वाचक हीच सनातन प्रभातची शक्ती ! – संपादक)

 

यवतमाळ येथे वाचक मेळावा !

यवतमाळ – येथील आदर्शनगर भागात सनातन प्रभातच्या वाचकांसाठी मेळावा घेण्यात आला. सनातनच्या सौ. सुनिता खाडे यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालक कु. माधवी चोरे यांनी वाचकांचे शंकानिरसन केले, तर सौ. धनश्री देशपांडे यांनी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ हा विषय मांडला. गटचर्चेच्या माध्यमातून वाचकांनी कार्यात कृतीशील होण्याची सिद्धता दर्शवली.

 

अकोला येथे सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा

अकोला – येथे सनातन प्रभातच्या वाचकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. श्री. धीरज राऊत आणि सौ. प्रतिभा जडी, तसेच सौ. विजया विभांडिक आणि सौ. माधुरी मोरे यांनी या वेळी सर्वांना मार्गदर्शन केले. वाचकांनी साधनेत कृतीशील होणार असल्याचे सांगितले.

वाचकांचे मनोगत

१. सनातन प्रभात हिंदु विचारांचा श्‍वास आहे. त्यावर बंदी येऊच शकत नाही. – श्री. सुधाकरराव जकाते, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक मंच, अकोला

२. राष्ट्र आणि धर्म, तसेच देवता यांच्या अवमानाच्या संदर्भातील जगाच्या पाठीवरील बातम्या सनातन प्रभातमध्येच वाचायला मिळतात. – श्री. विनायक राजंदेकर

 

गाजरवाडी (तालुका निफाड) (जिल्हा नाशिक) येथे सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा

श्री. शशिधर जोशी यांचे मार्गदर्शन ऐकतांना वाचक

गाजरवाडी (तालुका निफाड) (जिल्हा नाशिक) – येथे सनातन प्रभात नियतकालिकांच्या वाचकांचा मेळावा २७ नोव्हेंबर या दिवशी पार पडला. येथील श्री मारुति मंदिरात झालेल्या मेळाव्याला वाचक आणि जिज्ञासू उपस्थित होते. वाचकांचे मनोगत, त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच पुढील काळात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यात सहभागी होण्याची त्यांची सिद्धता हे मेळाव्याचे वैशिष्ट्य होते.

श्री. शिवाजी उगले यांनी मेळाव्याचा उद्देश, तसेच सनातन प्रभातच्या वतीने राबवले जाणारे उपक्रम यांविषयी वाचकांना अवगत केले. सौ. ज्योती पंडित यांनी ‘काळानुसार गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व, साधनेचे मूलभूत टप्पे’ यांचे महत्त्व सांगितले. तसेच श्री. शशिधर जोशी यांनी ‘राष्ट्र आणि धर्म जागृती अन् हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी सनातन प्रभातचे महत्त्व आणि योगदान’ यांविषयी वाचकांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या गटचर्चेनंतर वाचकांनी धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

वाचकांचे मनोगत

सनातन प्रभातच्या माध्यमातूनच आपला खरा इतिहास शिकायला मिळतो ! – श्री. रामदास शंकर वाढवणे

क्रांतीकारकांचे विचार आणि त्यांची माहिती ही केवळ सनातन प्रभातमधून मिळते. ती अन्य कोणत्याही दैनिकातून मिळत नाही. सनातन प्रभातच्या माध्यमातूनच आपला खरा इतिहास शिकायला मिळतो. मी साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क करून वर्गणीदार वाढवण्यासाठी प्रयत्न करीन, तसेच जे वर्गणी भरू शकत नाहीत, त्यांची किमान चार जणांची वर्गणी स्वत: भरेन.

साप्ताहिक सनातन प्रभात वाचतांना जे चैतन्य जाणवते, ते इतर कोणतेही दैनिक किंवा साप्ताहिक वाचतांना जाणवत नाही.  श्री. भरत गाजरे

साप्ताहिक सनातन प्रभातच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान मिळते. – कु. तेजस दाते (वय ११ वर्षे)

क्षणचित्र

सुरगाणा येथील श्री. परसराम कामडी आणि श्री. रमेश देशमुख हे मजूर गाजरवाडी येथे द्राक्षबागेत काम करण्यासाठी आले होते. तेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी विषय ऐकल्यावर ‘आम्ही गावाला गेल्यावर तरुणांना एकत्र करून बैठकीचे नियोजन करतो. तुम्ही तिकडे या. आपण तेथे कार्य चालू करू शकतो’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात