‘पद्मावती’च्या प्रदर्शनास विरोध

मिरज  – राणी पद्यावतीचा जाज्वल्य आणि पराक्रमाचा थोर इतिहास असतांना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यात महाराणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे. हा राणी पद्मावती यांचा घोर अपमान आहे. यामुळे राजपूत समाजासह संपूर्ण हिंदु समाजाच्या भावना तीव्र आहेत. करणी सेना आणि अन्य विविध राजपूत संघटना यांनी चित्रपटाला देशभरात तीव्र विरोध केला. चित्रपटाच्या संदर्भात समाजभावना तीव्र असल्याने शिवसेनेचाही तीव्र विरोध आहे आणि तो प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख श्री. विशालसिंह राजपूत यांनी केली. ‘पद्यावती’ चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मिरज येथील प्रांत कार्यालयात २२ नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. चंद्रकांत मैगुरे, उपशहरप्रमुख श्री. गजानन मोरे, कामगार सेनेचे तालुकाप्रमुख श्री. अनिल पाटील, सर्वश्री सुनील ढोले, भास्कर पवार, अमर कोळी, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री सुमेरसिंह राजपूत, सिद्धोबा विरेकर, नारायणसिंह राजपूत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मनोज गवळी, केदार गवळी, गिरीश पुजारी, सनातन संस्थेच्या श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले, सौ. रत्ना भंगाळे, तसेच अन्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात