सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी अलौकिक शक्ती असल्यासारखे जाणवते ! – श्री. अलोक त्रिपाठी, प्राचार्य, श्रीराम वल्लभ ‘इंटर कॉलेज’

फैजाबाद (उत्तरप्रदेश) येथील पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फैजाबादच्या जिल्हाधिकार्‍यांचीही ग्रंथप्रदर्शनाला भेट

सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन पहातांना जिल्हाधिकारी डॉ. अनिल कुमार पाठक (१)

फैजाबाद (उत्तरप्रदेश) – येथील शासकीय ‘इंटर कॉलेज’च्या मैदानात २ ते ७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनास जिल्हाधिकारी डॉ. अनिल कुमार पाठक, उत्तरप्रदेशमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री. निर्मल खत्री आणि या पुस्तक मेळाव्याच्या प्रमुख आयोजिका श्रीमती रिता खत्री आदी मान्यवरांनी भेट दिली.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी अलौकिक शक्ती
असल्यासारखे जाणवते ! – श्री. अलोक त्रिपाठी, प्राचार्य, श्रीराम वल्लभ ‘इंटर कॉलेज’

श्रीराम वल्लभ ‘इंटर कॉलेज’चे प्राचार्य श्री. अलोक त्रिपाठी म्हणाले, ‘‘सनातनच्या ‘मंदिरस्वरूप’ ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी येऊन मला चांगले वाटले. मी संपूर्ण येथील पुस्कांचे लागलेले विविध कक्ष (स्टॉल्स) फिरलो; परंतु सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी मला एक अलौकिक शक्ती असल्यासारखे जाणवले.’’ श्री. त्रिपाठी यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रवचन आयोजित करण्याचीही विनंती ग्रंथप्रदर्शनातील उपस्थित साधकांना केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात