सांगली येथे सनातन संस्थेच्या हितचिंतकांकडून वर्षश्राद्धाच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार !

ग्रंथप्रदर्शन पहातांना जिज्ञासू

सांगली – येथील माळी समाजाचे विश्‍वस्त आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. श्रीकृष्ण माळी यांनी त्यांचे वडील कै. जंबुराव धोंडीराम माळी यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यात्मप्रसार केला. श्री. माळी यांच्या घराण्यात वारकरी परंपरा आहे. सकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच धर्मशिक्षणविषयक फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहून माळी समाजातील अनेकांनी असेच प्रदर्शन त्यांच्या घरातील अन्य कार्यक्रमांमध्ये लावण्याची इच्छा व्यक्त केली. (वर्षश्राद्धाच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार करणारे श्री. श्रीकृष्ण माळी यांचे अभिनंदन ! इतरांनीही यातून प्रेरणा घेऊन अध्यात्मप्रसाराच्या संधीचा लाभ घ्यावा ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात