धर्मकार्य करतांना ईश्‍वरी अधिष्ठान हवे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हिंदु
राष्ट्राची स्थापना’ करणे अनिवार्य ! – मनोज खाडये, हिंंदु जनजागृती समिती

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनात संघटित होऊन कृती करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

समारोपप्रसंगी घोषणा देतांना धर्माभिमानी, मध्यभागी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (१)

बार्शी (जिल्हा सोलापूर) – भारताला सर्व स्तरांवर गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया संघर्षमय असली, तरी आपण शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम झाल्यास अशक्य काहीच नाही. ‘आसेतुहिमाचल’ असे हिंदूंचे अभेद्य संघटन करण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उपयुक्त असलेलेे हिंदु धर्मजागृती सभा, धर्मशिक्षण वर्ग, स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, तसेच आपत्कालीन साहाय्य आदी समानसूत्री कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करूया. ध्येयनिष्ठ व्यक्ती आणि संघटना यांच्या संघटनानेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य यशस्वी होणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले. ते येथील ‘विश्‍व गार्डन मंगल कार्यालया’त झालेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनात बोलत होते.

या वेळी महंत मावजीनाथ महाराज, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सोलापूर येथील माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर आदी मान्यवरांनी धर्मप्रेमींना संबोधित केले. या वेळी सोलापूर, लातूर, बीड आणि सातारा जिल्ह्यातील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘विश्‍व गार्डन मंगल कार्यालया’चे मालक श्री. सुरेश माने यांचा श्री. मनोज खाडये यांनी सत्कार केला.

हिंदूंनी शौर्याचे जागरण करण्याची आवश्यकता ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

ज्या ज्या वेळी धर्मावर आघात झाले, त्या त्या वेळी हिंदूंनी अतुलनीय शौर्य गाजवून धर्माचे रक्षण केले. यापुढेही छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन परत एकदा शौर्याचा इतिहास घडवून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरोधात संघटित मार्गाने
लढा देणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांंगोलकर, हिंदू विधिज्ञ परिषद

अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये दुष्प्रवृत्ती आणि भ्रष्टाचाराचा भस्मासुर वाढत आहे. लोकशाहीतील अशा दुष्प्रवृत्तींविरुद्ध संघटितपणे लढण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच उत्तम राज्यव्यवस्थेचा पाया उभारण्यास साहाय्य होईल.

धर्मकार्य करतांना ईश्‍वरी अधिष्ठान हवे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

धर्मरक्षणाचे कार्य करतांना साधनेचे पाठबळ आवश्यक असते. कौरवांशी लढतांना संख्येने अल्प असूनही पांडवांचा विजय झाला; कारण ते धर्माच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या बाजूने होते. ईश्‍वरी अधिष्ठानाविना धर्मकार्य अपूर्ण आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची अनिवार्यता ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

राजन बुणगे

अनेक संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते यांनी येणारा काळ हा अतिशय भीषण आणि आपत्तीजनक असल्याचे सांगितले आहे. भूकंप, चक्रीवादळ, अणुबॉम्ब, दंगली अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमध्ये समाजबांधवांना वाचवण्याचे आव्हान आपल्यापुढे असणार आहे. अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध असली, तरी ती सर्वांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा आहे. अशा वेळी आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे, तसेच त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

 

क्षणचित्रे

१. समारोपाच्या वेळी मनोगत व्यक्त करतांना धर्मप्रेमींचे डोळे पाणावले.

२. सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी ‘साधनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केल्यावर अचानक पाऊस आल्याने वरुणदेवतेचा आशीर्वाद लाभल्याचे जाणवले.

 

धर्मप्रेमींचे मनोगत

१. अधिवेशनाच्या आयोजनाच्या सेवेत सहभागी झाल्यावर पुष्कळ आनंद मिळाला. येथे ‘छोटे हिंदु राष्ट्र’ पहायला मिळाले. मला घरी जावेसे वाटतच नाही. मी माझा प्रत्येक क्षण हिंदु राष्ट्रासाठी देण्यास सिद्ध आहे. – श्री. राजकुमार गायके, अंबाजोगाई

२. अधिवेशनातून धर्माची तेजस्वी ज्योत घेऊन मी निघालो आहे. येथे अनेक विषयांची माहिती लाभली. त्यामुळे आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्नांची दिशा निश्‍चित केली आहे. – श्री. प्रवीण गिरी, लातूर

३. अधिवेशनातील सत्रांतून हिंदु राष्ट्रासाठी काहीतरी करावेसे वाटते. येतांना मी कोरी पाटी घेऊन आलो; मात्र ती आता येथील ज्ञानाने भरून घेऊन जात आहे. – श्री. रामचंद्र कचरे, माळशिरस

४. प्रांतीय हिंदु अधिवेशन हे छोटे हिंदु राष्ट्रच आहे. आपण सर्वजण हिंदु राष्ट्रातच बसलो आहोत. – श्री. योगेश तुरेराव, संपादक अग्रणी वार्ता, सोलापूर.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात