सनातन संस्थेच्या वतीने ‘हिमोफीलिया सोसायटी’च्या कार्यक्रमात साधनेविषयी मार्गदर्शन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ‘हिमोफीलिया सोसायटी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सानिका सिंह यांनी ‘नामजप आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा ६० विद्यार्थी आणि पालक यांनी लाभ घेतला. या वेळी ‘धार्मिक आणि कौटुंबिक कृती शास्त्रीय पद्धतीने कशा कराव्यात ?’ या विषयावर एक ध्वनीचित्रतबकडीही दाखवण्यात आली.

 

क्षणचित्रे

१. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला.

२. ‘आयएम्एस्-बीएच्यू’चे (‘इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स-बनारस हिंदु युनिव्हर्सिटी’चे) माजी संचालक डॉ. व्ही.पी. सिंह यांनी काही वेळ हे मार्गदर्शन ऐकले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘मी तुमचे प्रवचन ऐकले. प्रवचनात सांगितल्यानुसार मी प्रतिदिन प्रार्थना करीन.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात