पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाचा बुरखा फाडण्याचे कार्य सनातन करत आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची धर्माभिमानी हिंदूंची सिंहगर्जना

१८ सहस्र हिंदूंची अभूतपूर्व उपस्थिती

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने धर्मजागृती आणि हिंदूसंघटन व्हावे; म्हणून जळगाव येथे शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आलेली हिंदु धर्मजागृती सभा हिंदू विरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात भगव्या वातावरणात पार पडली. उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटिबद्ध होण्याची सिंहगर्जना केली. जळगाव जिल्ह्यातील ही आतापर्यंतची ६१ वी सभा होती. सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून जामिनावर सुटलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी, प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही धर्मसभेला संबोधित केले.

हिंदु युवांचा मेळा जमला हिंदु राष्ट्र स्थापन करण्या ।

हिंदुत्वासाठी कटिबद्ध मावळे जणू रामरायाची वानरसेना ॥

धर्मरक्षणाची तळमळ वाढो निरंतर आमच्या मनी ।

साधना म्हणून धर्मकार्य करण्याचा संस्कार होवो चित्ती ॥

अखेरच्या श्‍वासापर्यंत घडो आमच्याकडून धर्मसेवा ।

ब्राह्म आणि क्षात्र तेजाचे दान घालावे श्रीकृष्णा ॥

जळगाव – अन्याय, शोषण आणि अत्याचार यांविरोधात तरुणांना जागृत करण्याचे कार्य हाती घेणे, हाच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याचा प्रारंभ ठरणार आहे. क्षुल्लक भाडे आकारून मुंबई विद्यापिठासारख्या ठिकाणी देशद्रोही विधाने करणार्‍यांना कार्यक्रम घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते; मात्र पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना अटक करणारे अधिकारी कृष्णप्रकाश यांना बढती मिळण्याची, साध्वी प्रज्ञासिंह यांना मारहाण करणार्‍या परमवीरसिंह यांना मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्त करण्याची चर्चा केली जाते. यामुळे हिंदूंचे दमन होत आहे. हिंदु राष्ट्राची निर्मिती हाच यावरील उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. १९ नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. सभेला १८ सहस्र हिंदू एकवटले होते.

‘हिंदुत्व अपकीर्त करणारे, हिंदूंना धर्मापासून दूर नेणारे, देवतांवर अश्‍लाघ्य टीका करणारे, हिंदूंमध्ये फूट पाडणारे पुरो(अधो)गामी हेच हिंदूंचे खरे विरोधक आहेत’, असे सांगत अधिवक्ता पुनाळेकर यांनी पुरोगाम्यांचा दांभिकपणाही सोदाहरण उघड केला.

 

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सभेत राष्ट्र आणि धर्म द्रोह्यांच्या विरोधात व्यक्त केलेले प्रखर विचार

१. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली संभाजी ब्रिगेडने दशक्रिया चित्रपटाला विरोध केला; मात्र याच संभाजी ब्रिगेडने धर्मवीर संभाजी महाराज यांना हालहाल करून मारणार्‍या औरंगजेबाच्या नावाने असलेल्या ‘औरंगाबाद’ शहराला मात्र ‘संभाजीनगर’ असे नाव देण्याला विरोध केला.

२. ही संभाजी ब्रिगेड नाही, तर मंबाजी ब्रिगेड आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवळांचे रक्षण केले; मात्र देवळांच्या सहस्रावधी एकर जमिनी संभाजी ब्रिगेडच्या पुरस्कर्त्यांनी लुटल्या आहेत. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे असून हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहोत.

३. कन्हैयाकुमार मनुवादावर टीका करतो; मात्र ३७० कलमानुसार पंजाबमधील दलितांना नोकर्‍या न मिळण्याविषयी तो काही बोलत नाही. कन्हैयाकुमार मुसलमानांचे समर्थन करतो आणि हिंदुंमध्ये फूट पाडण्यासाठी काम करतो. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी एकजूट ठेवायला हवी. हिंदू म्हणून एकत्र रहायला हवे.

४. पुढे देशातील ‘मिनी पाकिस्तान’मधून धर्मांधांचे आक्रमण होईल, तेव्हा ‘सैन्य आणि पोलीस आपले रक्षण करतील’, या भ्रमात हिंदूंनी राहू नका. हिंदूंना स्वत:चे रक्षण स्वत:च करावे लागेल.

 

धर्मनिरपेक्षतेच्या जोखडातून मुक्त करून भारताला हिंदु राष्ट्र
बनवण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा पुरुषार्थ ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

१. विश्‍वातील प्रत्येक देशाची ओळख देशाच्या संस्कृतीवरून होते. धर्म हा संस्कृतीचा आत्मा आहे. विश्‍वातील प्रत्येक राष्ट्रामध्ये बहुसंख्यांकांच्या धर्माला राष्ट्रीय मान्यता आहे. विश्‍वात प्रत्येक देशात बहुसंख्यांकांच्या धर्माला विशेष संरक्षण असते. भारतात मात्र असे संरक्षण ख्रिस्ती आणि इस्लाम पंथाला आहे.

२. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या राजकारणामुळे भारत हिंदु राष्ट्राच्या स्वाभाविक अधिकारापासून वंचित आहे.

३. काँग्रेसचा हा हिंदु धर्मावरील सर्वांत मोठा आघात आहे. बुद्धीभेद आणि हिंदूंच्या धार्मिक आस्थांच्या संदर्भात भ्रम पसरवल्यामुळे भारताची वीर युवाशक्ती अजूनही भरकटलेली आहे. हे ओळखून भारताला धर्मनिरपेक्षतेच्या जोखडातून मुक्त करणे आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रजीवनाच्या सर्व अंगांमध्ये प्रयत्न करत रहाणे, हाच खरा पुरुषार्थ आहे.

४. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्यांच्याकडे सत्ता सोपवली गेली, ते मुळात स्वातंत्र्यसैनिक नव्हतेच; कारण जर ते असते, तर स्वतंत्र भारतात इंग्रजांचा ढाचा, इंग्रजीव्यवस्था कायम ठेवली गेली नसती. वेद, उपनिषदे यांना प्रतिष्ठा मिळाली असती.

५. हिंदूंचे दमन आणि अन्य धर्मियांना संरक्षण ही इंग्रजी नीती पुढे चालू ठेवली गेली नसती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी केवळ युद्ध करणार्‍यांच्या किंमतीवर सौदेबाजी केली गेली. भारतियांची मानसिकता दास्यत्वाची ठेवली गेली.

६. आपल्याला हे चित्र पालटायचे असेल आणि आपल्याला क्रांतीकारकांचे वंशज म्हणवून घेणार असू, तर हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे.

७. हिंदु राष्ट्र हा भारताचा स्वाभाविक अधिकार आहे. देहबल, धनबल, बुद्धीबल, विद्याबल असे आपल्यापैकी जे काही आहे, ते हिंदु राष्ट्रासाठी अर्पण करणे, हाच खरा पुरुषार्थ आहे.

 

पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाचा बुरखा
फाडण्याचे कार्य सनातन करत आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

१. हिंदुत्वासाठी सध्याचा काळ हा धु्रवीकरणाचा आहे. हिंदु राष्ट्राचे समर्थक आणि विरोधक असे २ मतप्रवाह आहेत.

२. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्यासारख्या नास्तिकतावादी आणि धर्मविरोधी पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे कार्य करत होते; मात्र सनातनने त्यांचा बुरखा फाडला.

३. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा विचार हिंदूंच्या मनांत सनातन संस्था प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे पुरोगाम्यांच्या दबावापोटी काँग्रेस, दायित्वशून्य प्रसारमाध्यमे सनातनला दडपण्याचे आणि पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणात सनातनला गोवण्याचे प्रयत्न करत आहेत; मात्र वैचारिक आतंकवादपुढे सनातन झुकणार नाही.

४. हिंदु राष्ट्र निर्मितीसाठीही हिंदु युवाशक्ती कार्यरत झाल्यास ‘कृण्वन्तो विश्‍वमार्यम्’ हे स्वप्नही साकार होईल.

 

भगव्या आतंकवादाचा नारा देणारे ‘आयएस्आय’चे हस्तक ! – श्री. सुधाकर चतुर्वेदी

१. हिंदुत्वाचे कार्य करणे, हा गुन्हा ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सुभाषचंद्र बोस हे आतंकवादी होते का ? असे असेल, तर मीही आतंकवादी आहे.

२. भगव्या आतंकवादाच्या नावाखाली तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात आम्हाला अडकवले. ‘हिंदु आतंकवाद’ या शब्दप्रयोगाद्वारे हिंदु धर्म, हिंदु समाज आणि हिंदुत्व यांची अपकीर्ती करण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र त्यांनी रचले. त्यांना हिंदुत्वावर निशाणा साधायचा होता. त्यांनी आम्हाला केवळ माध्यम बनवले. मालेगाव स्फोट प्रकरणात आमची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर आता कुणीही त्यांच्या चुकीच्या शब्दप्रयोगाविषयी बोलायला सिद्ध नाही.

३. प्रसारमाध्यमांना मला प्रश्‍न विचारायचा आहे की, माझ्या व्यक्तीगत जीवनाविषयी काही माहिती नसतांना मला आतंकवादी ठरवून टाकले. आता ही प्रसारमाध्यमे माझी जामिनावर सुटका झाल्यानंतर बारामती आणि सोलापूर येथे जाऊन शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना भगव्या आतंकाविषयी प्रश्‍न विचारतील का ?

४. ‘भगवा आतंकवाद’ हे नाव घेऊन या मंडळींनी राष्ट्र आणि धर्म यांवर आघात केला. भगव्या आतंकवादाचा नारा देणारे ‘आयएस्आय’चे हस्तक आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत गोड पदार्थ खाणार नाही ! – सुधाकर चतुर्वेदी यांची प्रतिज्ञा

‘जोपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही, तोपर्यंत मी गोड पदार्थ खाणार नाही, अशी परमात्म्याला साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो’, असा निश्‍चय सुधाकर चतुर्वेदी यांनी केला आहे. (जळगाव सभेत भाषण करतांना उपस्थित जनसमुदायासमोर त्यांनी ही प्रतिज्ञा केली.)

 

… तर रोहिंग्या मुसलमानांना स्वत:च्या घरात ठेवून घ्या ! – सुनिल घनवट

१. मुंबईमध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करण्यासाठी १० दिवस चर्चमध्ये ठेवल्याची घटना नुकतीच घडली. उठसूट हिंदु धर्मावर टीका करणारी अंनिस आता कुठे गेली ?

२. मागील ७० वर्षांत वाढलेला भ्रष्टाचार, महागाई, आत्महत्या या निरर्थक लोकशाहीच्या द्योतक आहेत. जळगावमध्ये होणारी टिपू सुलतानची जयंती हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे रहित करण्यात आली. मागील वर्ष हे हिंदुत्वनिष्ठांच्या अटकेचे, चालू वर्ष सुटकेचे, तर पुढील वर्ष हिंदुत्वनिष्ठांचा छळ करणार्‍यांच्या अटकेचे राहील.

३. हिंदू असेच संघटित झाले, तर ‘भगवा आतंकवादी’ शब्द उच्चारण्याची कुणाची हिंमत होणार नाही.

४. रोहिंग्या मुसलमानांना भारतात आश्रय मिळण्यासाठी जळगाव शहरात समाजवादी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. असे असेल, तर रोहिंग्या मुसलमानांना स्वत:च्या घरात ठेवून घ्या.

भिलपुर्‍यातील अनधिकृत मशिदीवर कारवाई कधी ?

जळगाव महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही मंदिरे अनधिकृत ठरवली असून ती पाडण्याचा घाट घातला आहे; मात्र भिलपुर्‍यातील अनधिकृत मशीद पाडण्याची हिंमत कधी करणार ? (असा प्रश्‍न उपस्थित करत श्री. घनवट यांनी पोलीस-प्रशासनाच्या हिंदुद्रोही भूमिकेवर टीका केली.)

‘पद्मावती’ चित्रपटावर बहिष्कार टाका !

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहनही श्री. सुनील घनवट यांनी केले. या चित्रपटाच्या विरोधात २५ नोव्हेंबरला शहरात भव्य निषेध आंदोलन घेऊन चित्रपटाला विरोध दर्शवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

व्यवस्थेतील दुष्प्रवृत्तींच्या विरुद्ध लढा देण्यासाठी सिद्ध व्हा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

राज्यकर्ते, पोलीस, प्रशासन आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या स्तंभावरील विश्‍वास उडाला; म्हणूनच यापुढे या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. उपस्थितांपैकी अनेकांनी या दुष्प्रवृत्तींचा अनुभव घेतला असेल. आपल्यापैकी काहींना पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले असेल. ही अन्याय्य लोकशाही व्यवस्था हटवण्यासाठी एका क्रांतीकारी आंदोलनाची आवश्यकता आहे. ‘मी एकटा काय करणार ?’ असा विचार करू नका, हिंदूंचे सर्व प्रकारचे हित जपणारे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र, रामराज्य स्थापन होईल, याची निश्‍चिती बाळगा !

 

धर्मसभेच्या शेवटी उपस्थितांनी नमस्काराच्या
मुद्रेत उभे राहून हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होण्याची घेतलेली प्रतिज्ञा !

‘धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण या धर्मसभेच्या व्यासपिठावरील पडद्यावरील चित्राच्या रूपात उपस्थित आहे. त्याच्या साक्षीने आम्ही शपथ घेतो की, देव, देश आणि धर्म यांची कोणत्याही प्रकारची विटंबना आही सहन करणार नाही !

हे श्रीकृष्णा, देव, देश आणि धर्म यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा तीव्र प्रतिकार करून ते परतवून लावण्यासाठी आम्हास तूच बळ दे !

हे श्रीकृष्णा, आम्ही प्रतिज्ञा करत आहोत की, हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच ! त्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनू ! प्रभु श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या आदर्शपथावरून मार्गक्रमण करू ! आमच्या सर्वश्रेष्ठ अशा पूर्वज ऋषिमुनींनी घालून दिलेल्या परंपरांचा आम्ही सार्थ अभिमान बाळगू ! त्यांनी निर्माण केलेले धर्मग्रंथ, संस्कृती, परंपरा आदींचे आम्ही काटेकोरपणे पालन करू ! आम्ही आमच्या देवळांचे प्राणपणाने रक्षण करू ! येथून पुढे हिंदु राष्ट्र हेच आमच्या जीवनाचे ध्येय असेल आणि त्यासाठी आम्ही अखेरच्या श्‍वासापर्यंत कार्यरत राहू ! हिंदु राष्ट्र्र स्थापन केल्याविना आता आम्ही शांत बसणार नाही ! आता लक्ष्य एकच, हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र्र !!

 

सभेनंतरच्या चर्चेत ५०० हून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग !

धर्मसभा संपल्यानंतर जवळपास ५०० हून अधिक धर्माभिमानी वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होते. त्या वेळी शहरातील स्थानिक धर्म आणि राष्ट्र विषयक सूत्रांवर चर्चा झाली. शहरातील एका चौकाचे काही धर्मांधांनी ‘संतोषी माता मंदिर चौका’चे ‘शेरा चौक’ असे नाव ठेवण्याचा घाट घातला आहे. त्याला प्रखर विरोध करण्याचा, तसेच धर्म आणि राष्ट्र विषयक आघातांचा संघटित प्रतिकार करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. भुसावळ, वरणगांव येथे अवैधरित्या सर्रास होणारी गोमांस विक्री, अश्‍लील विज्ञापनांच्या माध्यमातून होणारे संस्कृतीचे हनन आदी सूत्रांच्या विरोधात कृती करण्याचे, तसेच ठिकठिकाणी अशा हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्याचे या वेळी ठरवण्यात आले.

सत्यावर आधारित ज्ञानाधिष्ठित शिक्षणपद्धती हवी ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

सत्यावर आधारित ज्ञानाधिष्ठित शिक्षणपद्धती असायला हवी; मात्र दुर्दैवाने आज शिक्षणसंस्थांमध्ये भावनांचा प्रचार केला जात आहे. विद्यालयांमध्ये ज्ञानाचे अनुसंधान असायला हवे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार आणि वाराणसी येथील गांधी विज्ञान संस्थेचे निर्देषक प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी केले. २० नोव्हेंबरला नूतन मराठा महाविद्यालय येथे महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांच्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. (सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

 

हिंदु धर्माची सेवा करणे माझे कर्तव्य आहे ! – भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे (राजूमामा)

हिंदु जनजागृती समिती हिंदूंसाठी करत असलेले कार्य ही काळाजी आवश्यकता आहे. हिंदू बांधव धर्म विसरत चालले आहेत. इस्लाम आणि ख्रिस्ती यांना धर्माचे शिक्षण दिले जाते; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. समितीच्या माध्यामातून लोकांपर्यंत धर्मकार्य पोचत आहे. मी हिंदु धर्मात जन्माला आलो आहे. हिंदु धर्माची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. मी तन-मन-धन अर्पण करून धर्माची सेवा करीन.

 

वैशिष्ट्यपूर्ण

१. शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी हे २ दिवसांपासून ३५-४० कार्यकर्त्यांसह सभेच्या सिद्धतेच्या सेवेत सक्रिय सहभागी झाले होते.

२. भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे यांनी सभा संपल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांना सभेची आवराआवर करण्याच्या सेवेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

धर्मसभेसाठी सहकार्य करणार्‍यांचे आभार !

धर्मसभा यशस्वी होण्यासाठी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. शाम कोगटा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी २ दिवस साधकांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच शहरातील अन्य हिंदुत्वनिष्ठ, तसेच पोलीस-प्रशासनाने यांचेही सहकार्य लाभले.

 

वंदनीय उपस्थिती

सनातनच्या संत पू. केवळबाई पाटील आजी, महंत रणजीश पुरीजी महाराज, ह.भ.प. कृष्णाजी महाराज, ह.भ.प.चंद्रशेखर महाराज शिरसोलीकर, ह.भ.प. मुकुंद महाराज धर्माधिकारी, ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदे, ह.भ.प. सोपान महाराज राजपूत, ह.भ.प. अमोल पाटील महाराज, बालकीर्तनकार ह.भ.प. माईसाहेब महाराज.

 

धर्मरक्षणाची दिशा देण्यासाठी आढावा बैठका

१. २२ नोव्हेंबर – श्री. गायत्री मंदिर, विसनजीनगर, सायंकाळी ७

२. २२ नोव्हेंबर – श्रीराम मंदिर, पाळधी (ता. धरणगाव), सायंकाळी ७

३. २५ नोव्हेंबर – श्री दत्त मंदिर, एरंडोल, सायंकाळी ७

आढावा बैठकांना बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात