सहस्रो हिंदु विरांची हिंदु राष्ट्र स्थापनेची गगनभेदी ललकारी !

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘एकच ध्येय, एकच लक्ष्य, हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !!’चा जयघोष

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुधाकर चतुर्वेदी, श्री. सुनील घनवट, प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर

जळगाव   – प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जळगाव भूमीत ‘आता एकच ध्येय, एकच लक्ष्य, हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !!’ ही हिंदु विरांची हिंदु राष्ट्र स्थापनेची गगनभेदी ललकारी दुमदुमली ! निमित्त होते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ नोव्हेंबरला न्यायालय चौकातील शिवतीर्थ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचे ! धर्मजागृती सभेत एकवटलेल्या सहस्रो हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची प्रतिज्ञा केली.

आरंभी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते हिंदु धर्मजागृती सभेची दीपज्योती प्रज्वलित झाली. यानंतर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून जामिनावर सुटलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थित धर्माभिमानी हिंदूंना संबोधित केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात