हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्यासाने प्रेरित झालेले संघटित जळगाव येथील हिंदू

हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने जळगाव शहरात भव्य वाहनफेरी !

भगव्या वाहनफेरीमुळे जळगाव हिंदुत्वमय !

फेरीला ७५० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती

वाहनफेरीमध्ये उपस्थित धर्माभिमानी हिंदू

जळगाव  – ‘एकच ध्येय, एकच लक्ष्य । हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र ।’, ‘कौन चले रे कौन चले, हिंदु राष्ट्र के वीर चले’, अशा घोषणांच्या गजरात येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ निघालेल्या भगव्या वाहनफेरीमुळे संपूर्ण शहरच हिंदुत्वमय झाले. या फेरीला ७५० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

फेरीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक दुचाकी वाहनावर लावण्यात आलेले भगवे ध्वज, उपस्थितांकडून देण्यात येणार्‍या वीरश्रीयुक्त घोषणा, तुतारीवादन, धर्मध्वजाचे पूजन, उत्साही अन् धर्मकार्यासाठी सिद्ध झालेले हिंदु युवक, पारंपरिक वेशातील रणरागिणी, बालसाधक आणि चौकाचौकांमध्ये होणारी पुष्पवृष्टी ही या फेरीची वैशिष्ट्ये ठरली.

 

१९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : शिवतीर्थ मैदान, न्यायालय चौक, जळगाव     

वेळ : सायंकाळी ५.३०

वक्ते : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून जामिनावर सुटलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट

 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्यासाने प्रेरित झालेले संघटित हिंदू ठरले वाहनफेरीचे आकर्षण !

१७ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता येथील नेहरू चौकापासून फेरीला प्रारंभ झाला. पत्र्या हनुमान चौक, नवीन बसस्थानक, आकाशवाणी, एम्.जे. महाविद्यालय, रिंग रोड यामार्गे जाऊन शिवतीर्थ मैदानावर फेरीची सांगता झाली.

‘हिंदु धर्माच्या रक्षणार्थ हिंदूंनाच कृतीशील व्हावे लागणार आहे. हिंदु धर्मजागृती सभेला येणे, हे आमचे कर्तव्यच आहे’, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करत समाजातील लोकांनी धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचा निर्धार व्यक्त केला. फेरीचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी केले.

धर्मध्वजपूजनाचा क्षण !

आरंभी उद्योजक तथा समाजसेवक श्री. नरेश खंडेलवाल, बजरंग दलाचे देवगिरी प्रांताचे श्री. ललित चौधरी आणि महाराष्ट्र राज्य अन्यायविरोधी जनजागृती मंचाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुभाष सांखला यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत् पूजन करण्यात आले. श्री. महेंद्र जोशीगुरुजी यांनी पूजा सांगितली. यानंतर शंखनाद आणि तुतारीवादन होऊन वाहनफेरी मार्गस्थ झाली. फेरीच्या मार्गावर मुख्य चौकांमध्ये विविध मान्यवरांनी धर्मध्वजाचे पूजन करून फेरीचे स्वागत केले. समारोपप्रसंगी फेरीचे सभेत रूपांतर झाले.

 

मान्यवरांनी केले वाहनफेरीचे स्वागत !

‘दुर्गा ट्रॅव्हल्स’चे मालक श्री. सुनील कोल्हे, भाजयुमोचे शहरप्रमुख श्री. नीलेश पवार यांनी टॉवर चौक येथे, जय गोविंद मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शाम कोगटा यांनी इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या समोर, छायाचित्रकार असोसिएशनचे श्री. शिरीष पाटील यांनी नवीन बसस्थानकाच्या समोर, जय माता दी गटाचे श्री. नीरज जेसवानी, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत खटोड यांनी काव्यरत्नावली चौक येथे, सनशाईन इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांच्या बंगल्यासमोर, बहिणाबाई चौकात माजी नगरसेवक श्री. कैलासअप्पा सोनवणे, रिंगरोड चौकात हिंदुत्वनिष्ठ श्री. परेश वाणी यांच्या मातोश्री श्रीमती संगीता वाणी यांनी, धर्मप्रेमी गणेश टेकवडे आणि अधिवक्ता राजेश काबरा, नूतन मराठा महाविद्यालयाजवळ श्री. अमरसिंह पवार यांनी आणि न्यायालय चौकात जळगाव जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अधिवक्ता मिलिंद बडगुजर, खजिनदार अधिवक्ता महेश ढाके, माजी अध्यक्ष अधिवक्ता लक्ष्मण वाणी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह अधिवक्ता गोविंद तिवारी, अधिवक्ता निरंजन चौधरी, अधिवक्ता सुभाष तायडे, न्यायालयीन कर्मचारी रामा तिवारी यांनी वाहनफेरीचे स्वागत केले.

 

सभेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

धर्मयज्ञ प्रज्वलित करण्यास लागणार्‍या धगधगत्या निखार्‍यांचे गाव म्हणजे जळगाव आहे. जात, पात, पंथ, पक्ष, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एक होण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान, बांग्लादेश, चीन या देशांना धडा शिकवून मातृभूमीची आर्त हाक ऐकू येण्याची आता वेळ आहे. घराघरांत हिंदुसूर्य निर्माण करण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले असून सभेला अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे. – श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

कुणीही सनातनरूपी तळपत्या सूर्याला झाकण्याचा प्रयत्न केला, तरी ते अशक्य आहे. संपूर्ण विश्‍वात धर्मतेज पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. – श्री. हेमंत मणेरीकर, सनातन संस्था

या वाहनफेरीचे फेसबूकवरून ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले. ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ३१ सहस्र ९०० जणांनी वाहनफेरी पाहिली, तर सभेचा विषय १ लाखांहून अधिक जणांपर्यंत पोहोचला.

 

उपस्थित मान्यवर

वाहनफेरीत सहभागी धर्माभिमानी

सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून जामिनावर सुटलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी, महानगरपालिकेतील गटनेते श्री. सुनील माळी, बजरंग दलाचे श्री. ललित चौधरी, जळगाव जिल्हा छायाचित्रकार संघटनेचे श्री. शिरीष पाटील, व्यापारी श्री. अनिल पगारिया, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट

 

फेरीला उपस्थित संघटना

स्वराज्य निर्माण सेना, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जय माता दी ग्रुप, अयोध्यानगर मित्रमंडळ, संत गाडगेबाबा मित्रमंडळ, जय गोविंद मित्रमंडळ, पैलवान गट, शिवसेना, भाजप, जळगाव जिल्हा अधिवक्ता संघटना, फुले मार्केट मित्रमंडळ, जय श्रीराम गट, सिंधी कॉलनी मित्रमंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवबा प्रतिष्ठान, विश्‍व हिंदु परिषद, जळगाव जिल्हा छायाचित्रकार संघटना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती

 

वाहनफेरीविषयी काही निवडक प्रतिक्रिया

१. हिंदु राष्ट्रासाठी आपण जे प्रयत्न करत आहात, ते प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण आहेत. ज्या प्रकारे रामायणामध्ये रामसेतू निर्माण करण्याचा काळ, तसेच महाभारतात पांडवांनी अज्ञातवासातून येण्याचा काळ प्रेरणादायी आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्या माध्यमातून हिंदूंमधील धर्मभावना जागृत करत आहे. – श्री. शिबशंकर कुंडू

२. वाहनफेरीमुळे शहरातील वातावरण पूर्णपणे पालटले आहे. या वर्षी सभेला ५० सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित रहातील. – श्री. शिरीष पाटील, अध्यक्ष, जळगाव जिल्हा छायाचित्र संघटना

३. फेरीमुळे हिंदूंचे सामर्थ्य वाढत आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही, हा विश्‍वास वाटतो. – एक धर्मप्रेमी

४. हिंदु धर्मजागृती सभेसारखे कार्यक्रम ही काळाची आवश्यकता आहे. हे कार्यक्रम ठिकठिकाणी व्हायला हवेत. ही वाहनफेरी पाहून प्रेरणा मिळाली. – श्री. विश्‍वास शिरोडे

५. हिंदु जात-पात विसरून हिंदु म्हणून सहभागी झाले आहेत. फेरीचे स्वागत करतांना आनंद होत आहे. वाहनफेरी पाहून सभेविषयी उत्सुकता निर्माण झाली. सभेला येतांना अन्य अधिवक्त्यांनाही समवेत घेऊन येईन. – अधिवक्ता मिलिंद बडगुजर, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा बार असोसिएशन

 

क्षणचित्र

रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक, तसेच नूतन मराठा महाविद्यालय आणि मुळजी जेठा महाविद्यालय येथील विद्यार्थी वाहनफेरी पहात होते, तसेच उत्स्फूर्त घोषणा देऊन हिंदु राष्ट्राला पाठिंबा देत होत अन् भ्रमणभाषवर चित्रीकरणही करत होते.

 

भाजपचे आमदार राजूमामा भोळे आणि चंदूभाई पटेल
यांना जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !

जास्तीत जास्त संख्येने हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा ! – राजूमामा भोळे, आमदार

आमदार राजूमामा भोळे (उजवीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते

जळगाव  – येथे १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या विराट हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे आमदार राजूमामा भोळे, तसेच विधानपरिषदेचे भाजपचे आमदार चंदूभाई पटेल यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. आमदार चंदूलाल पटेल यांनी सभेला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.

आमदार चंदूभाई पटेल (डावीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते

हिंदु एकता आणि हिंदु राष्ट्र निर्मिती यांसाठी सर्वांनी वेळ काढणे आवश्यक आहे. आपला परिवार, मित्र, नातेवाईक सर्वांना घेऊन जास्तीत जास्त संख्येने हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहावे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात