स्वत:तील दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक ! – श्री. रमानंद गौडा, कर्नाटक राज्य धर्मप्रसार सेवक, सनातन संस्था

कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी स्वत:तील दोष आणि
अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक ! – श्री. रमानंद गौडा, कर्नाटक राज्य धर्मप्रसार सेवक, सनातन संस्था

साधकांना मार्गदर्शन करतांना श्री. रमानंद गौडा

मंगळुरू (कर्नाटक) – कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी त्या साधकाला स्वत:तील दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक असते. आपले मन शुद्ध झाले, तरच आपल्यातील सत्त्वगुणामध्ये वृद्धी होते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रसार सेवक श्री. रमानंद गौडा यांनी येथे आयोजित दक्षिण कन्नड जिल्हास्तरीय कार्यशाळेत केले. सनातन संस्थेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मंगळुरु येथील सनातनच्या सेवाकेंद्रात पार पडलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश सनातनच्या सौ. मंजुळा गौडा यांनी सांगितला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात