मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात दूर होण्यासाठी विविध मागण्यांसाठी निवेदन

-जिल्हाधिकारी श्री. दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

मुंबई  – विविध मागण्यांसाठी ५ नोव्हेंबरला भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर आणि ८ नोव्हेंबरला जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकाबाहेर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. यावेळी लोकजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. शेकडो राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी स्वाक्षर्‍या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. १४ नोव्हेंबरला मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांना राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात दूर होण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. स्वाक्षरी अभियानामध्ये नागरिकांनी केलेल्या स्वाक्षर्‍यांचे कागद पुढील कार्यवाहीसाठी श्री. कुशवाह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. भाविका पटेल आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. लक्ष्मण जठार उपस्थित होते.

 

निवेदनात केलेल्या मागण्या

१. हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्यांमागील षड्यंत्राचा शोध घेऊन आरोपींवर लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

२. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानचे उदात्तीकरण थांबवून खरा इतिहास अभ्यासावा आणि त्याची जयंती साजरी करण्याला स्थगिती द्यावी.

या वेळी श्री. कुशवाह यांना सनातन पंचांग २०१८ आणि दैनिक सनातन प्रभातचा ‘गुणसंवर्धन’ विशेषांक भेट देण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात