सर्वश्रेष्ठ हिंदु संस्कृतीचे आचरण करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

दर्यापूर (अमरावती) येथील हिंदु धर्मजागृती सभेला १ सहस्र ४०० धर्माभिमान्यांची उपस्थिती

डावीकडून कु. माधवी चोरे, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि श्री. हेमंत मणेरीकर

दर्यापूर (अमरावती) – येथे १२ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेला १ सहस्र ४०० धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली. सभेसाठी धर्माभिमान्यांनी पुढाकार घेतला होता.

या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. माधवी चोरे हेही वक्ते म्हणून उपस्थित होते. सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला प्रारंभ झाला. श्री. हेमंत मणेरीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी समितीच्या कार्याची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. अनुभूती टवलारे आणि श्री. कपिल देव यांनी केले.

 

सर्वश्रेष्ठ हिंदु संस्कृतीचे आचरण करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी स्वतः धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण न करता सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माने दिलेल्या संस्कृतीचेच आचरण करावे !

समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि सुराज्य अभियान याविषयी मार्गदर्शन केले, तर रणरागिणी शाखेच्या कु. माधवी चोरे यांनी शौर्यजागरण आणि स्वसंरक्षण यांची आवश्यकता ! याविषयी मार्गदर्शन केले. दर्यापूर येथील धर्मप्रेमी श्री. संदीप राजगुरे यांनी आभारप्रदर्शन केले.

क्षणचित्र

१२ धर्मप्रेमींसाठी धर्मजागृती सभेचा पहिलाच अनुभव असतांनाही त्यांनी सभेच्या आयोजनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

 

सहकार्य

१. रामायण सेवा समितीचे श्री. नवल मालपाणी यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.

२. श्री. पंकज राठी यांनी अल्पदरात बिछायत साहित्य उपलब्ध करून दिले. सार्वजनिक वाचनालयाच्या विश्‍वस्त मंडळाने सभेसाठी मैदान विनामूल्य उपलब्ध करून दिले.

३. बांधकाम व्यावसायिक श्री. संजय भारसाकळे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात