सनातन संस्थेने सांगितलेला साधनामार्ग सर्वांनी अवलंबावा ! – डॉ. मनोहर कुलकर्णी

वारजे (पुणे), कोल्हापूर आणि वर्धा येथील वाचक मेळाव्यांना वाचकांचा उत्स्फूर्त अन् कृतीशील प्रतिसाद !

  • वाचकांना सनातनच्या कार्याचे कौतुक
  • वाचकांचा सनातन प्रभातला पाठिंबा
पुणे येथील मेळाव्यात डॉ. मनोहर कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करतांना

वारजे (पुणे) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधनामार्गात नामजपाला महत्त्व दिले आहे. या मार्गाने साधना केल्यास आयुष्याचा नक्कीच उद्धार होईल, याची मला निश्‍चिती वाटते. माझ्या आईनेही नामसाधना करून आनंदावस्था अनुभवली आणि तिला अनेक अनुभूतीही आल्या. त्यामुळे सनातन संस्थेने सांगितलेला साधनामार्ग सर्वांनी अवलंबण्यास काहीच अडचण नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चांगले साधक निर्माण केले आहेत, याचा मला अभिमान वाटतो, असे कृतार्थ बोल येथील सनातन प्रभातच्या वाचक मेळाव्यात डॉ. मनोहर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या वेळी ४० वाचक उपस्थित होते. मेळाव्याच्या शेवटी झालेल्या गटचर्चेत वाचकांनी राष्ट्र-धर्म कार्यात कृतीशील होणार असल्याचे सांगितले.

या वेळी सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या ज्योती काळे आणि श्री. सम्राट देशपांडे यांनी सनातन प्रभातचे महत्त्व आणि साधना यांविषयी मार्गदर्शन केले.

 

वाचकांचे मनोगत

खर्‍या आनंदाविषयी मार्गदर्शन करणारे सनातन प्रभात ! – अरविंद नेरकर

व्यावहारिक तापातून बाहेर पडून देवाकडे म्हणजे खर्‍या आनंदाकडे जाण्यासाठी सनातन प्रभात मार्गदर्शन करते. मी धर्मशिक्षण वर्गात येईन आणि सेवेत सुद्धा सहभागी होईन.

सनातन संस्थेने मला योग्य वळणावर आणले ! – सौ. सविता राजाज्ञा

मला आयुष्यात योग्य वळणावर येण्यासाठी सनातन संस्थेचा मोठा वाटा आहे. मला कधीही कोणतीही अडचण आल्यास मी सनातन संस्थेचे संकेतस्थळ पाहून तेथे सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक उपाय करते. त्यामुळे माझ्या स्वभावातही पुष्कळ पालट झाला. माझी सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची तीव्र इच्छा आहे.

 

वैशिष्ट्यपूर्ण घटना

१. वारजे येथील वाचक सौ. सरकाळे त्यांच्या ४ मासांच्या बाळाला घरी सोडून वाचक मेळाव्याला आल्या होत्या.
२. सर्व वाचक नामजपाविषयी जिज्ञासूपणे शंका विचारत होते.
३. सर्व वाचकांनी धर्मशिक्षणवर्गात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

 

कोल्हापूर

सनातन प्रभातमुळे पुष्कळ मोठे कार्य घडत आहे ! – अनिल दिंडे

कोल्हापूर येथील मेळाव्यात मार्गदर्शन ऐकतांना वाचक

कोल्हापूर – सनातन प्रभात म्हणजे घरी येऊन मार्गदर्शन करणारी पत्रिका आहे. समाजातील घडामोडी आणि आपण काय करायला हवे, याविषयी सनातन प्रभातमधूनच समजते. अन्य प्रसिद्धीमाध्यमे केवळ आर्थिक आणि प्रसिद्धी यांचाच विचार करतात. सनातन प्रभातमुळे पुष्कळ मोठे कार्य घडत आहे, असे वाचक श्री. अनिल दिंडे यांनी सांगितले. येथील वाचक मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचा ७२ वाचकांनी लाभ घेतला.

सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या शिल्पा कोठवळे यांनी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व आणि गुरुकृपायोग’ यांचे महत्त्व विशद केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी वाचकांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन प्रभातचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले.

 

वाचकांचे मनोगत

सनातन प्रभातच्या नियमित वाचनामुळे आजार अल्प झाले ! – सौ. माधुरी कुलकर्णी

मला उच्च रक्तदाब, श्‍वास घेण्यास त्रास होणे, डोळे लाल होणे, पोट दुखणे इत्यादी आजार होते; पण सनातन प्रभातचे नियमित वाचन आणि नामजप यांमुळे आजार अल्प झाले. मन एकाग्र झाले आणि भीती वाटण्याचे प्रमाण न्यून झाले.

सेवेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढली ! – हरी विष्णू कुंभार

मागील १० वर्षांपासून मी सनातन प्रभातचा नियमित वाचक आहे. नामजप, सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण या माध्यमातून मी सेवा करू लागलो. यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील माझी श्रद्धा वाढली आणि त्यांनी माझी आध्यात्मिक उन्नती करून घेतली. यंदाच्या गुरुपौर्णिमेला मला गुरुपूजनाची संधी मिळाल्याने माझे जीवन सार्थकी झाले.

 

वर्धा

वाचकांकडून धर्मकार्यात सहभागी होण्याच्या प्रत्यक्ष नियोजनास मेळाव्यापासूनच प्रारंभ !

येथील वाचक मेळाव्यात ३३ वाचक सहभागी झाले होते. वाचक मेळाव्याचा उद्देश आणि सनातन प्रभातचे महत्त्व यांविषयी श्रीमती सुमती सरोदे यांनी, तर साधना आणि गुरुकृपायोग यांविषयी सौ. शिल्पा पाध्ये यांनी मार्गदर्शन केले. गटचर्चेत वाचकांनी धर्मकार्यात सहभागी होणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले आणि प्रत्यक्ष नियोजनही गेले.

 

वैशिष्ट्यपूर्ण

१. वाचक सौ. तळवेकर यांनी धर्मशिक्षण देणारी १०० पत्रके समाजात देण्याची सिद्धता दर्शवली.
२. मेळाव्यानंतर १५ वाचक आणि हिंतचिंतक यांनी साहित्य आवरण्यास साहाय्य केले.
३. अनेक वाचक महिलांनी मकरसंक्रातीला सनातनची सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्याचा निश्‍चय केला.

 

सनातनवरील आरोपांच्या संदर्भातील वाचकाच्या
प्रश्‍नाला सनातनच्या बाजूने उत्तर देणारे वाचक श्री. अनिल दिंडे !

गटचर्चेत एका वाचकाने विचारले, ‘‘सनातन संस्थेवरच सातत्याने आरोप का होत आहेत ?’’ त्यावर वाचक श्री. अनिल दिंडे म्हणाले, ‘‘सनातन प्रभातच खर्‍या अर्थाने धर्मप्रसाराचे कार्य करते. त्यामुळे सनातनला अपकीर्त करण्याचे हे षड्यंत्र आहे. आपण सनातनच्या बाजूने उभे राहूया !’’ (सनातनच्या बाजूने बोलणारे वाचक हीच खरी धर्माची शक्ती आहे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात