सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीकडून पद्मावतीच्या संदर्भात सेन्सॉर बोर्डाला निवेदन

हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींना चित्रपट दाखवण्याची मागणी

मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १४ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) मुख्य कार्यालयात जाऊन पद्मावती चित्रपटाच्या विरोधात निवेदन दिले. या वेळी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजू वैद्य यांनी ते निवेदन स्वीकारले.

पद्मावती चित्रपटाच्या संदर्भात समाजभावना अतिशय तीव्र आहेत, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी दिग्दर्शक संजय भन्साळी यांना हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींना हा चित्रपट दाखवण्यास सांगावे, तसेच आक्षेपांचे निरसन करण्यास सांगावे. त्यानंतरच चित्रपटाला प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात केली.

यावर वैद्य म्हणाले, अद्याप आमच्याकडे हा चित्रपट आलेला नाही. आल्यानंतर आम्ही या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी तो काळजीपूर्वक पाहू, त्यानंतरच प्रमाणपत्र देऊ, असे आश्‍वासन दिले. या वेळी शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतिश कोचरेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रकांत भदिर्के आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांचा समावेश होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात