जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ‘शिवनेरी व्यापार प्रदर्शना’त सनातन संस्थेचा सहभाग

मध्यप्रदेश राज्यात चालू असलेले सनातनचे धर्मप्रसाराचे कार्य !

प्रदर्शनाला महापौर, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांची भेट

प्रदर्शनात सहभागी झाल्याविषयी महापौर डॉ. स्वाती गोडबोले (डावीकडून तिसर्‍या) यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारतांना सनातनचे साधक

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे मराठी उद्योजक संघाच्या वतीने ‘शिवनेरी व्यापार प्रदर्शना’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ तसेच सात्त्विक उत्पादने यांच्या विक्रीचे प्रदर्शन लावण्यात आले. प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाला जबलपूरच्या महापौर डॉ. स्वाती सदानंद गोडबोले, जिल्हाधिकारी श्री. महेशचंद्र चौधरी, डॉ. जामदार, डॉ. हस्तक आदी मान्यवरांनी भेट दिली. प्रदर्शनात सहभागी झाल्याविषयी महापौर डॉ. स्वाती गोडबोले यांनी सनातनच्या साधकांना प्रमाणपत्र दिले.

 

क्षणचित्र

प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण फलकांनी जिज्ञासूंचे लक्ष वेधून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात