उज्जैन येथील ‘हाथकरघा आणि हस्तशिल्प’ मेळ्यात सनातनचे ग्रंथप्रदर्शन

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील जिल्हा पंचायतीच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘हाथकरघा आणि हस्तशिल्प’ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनासाठी मेळा समितीचे पदाधिकारी श्री. अखिलेश उपाध्याय, श्री. प्रमोद राठोड आणि अन्य पदाधिकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळाले. (मेळा समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांचे आभार ! हिंदूंनो, यातून बोध घेऊन धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा नि आपले धर्मकर्तव्य बजावा ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात