(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना सनातनी शक्तींनी गोळ्या घालून ठार मारले !’

स्वतःला अन्वेषण यंत्रणेपेक्षा मोठे समजणार्‍या हिंदुद्वेषी डॉ. भारत पाटणकर यांचा कांगावा !

या हत्यांच्या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने कुठेही सनातनी शक्तींचा उल्लेख केलेला नसतांना केवळ हिंदुद्वेषापोटी डॉ. पाटणकर अशी विधाने करून जनतेची दिशाभूल करत आहेत. यासाठी आता अन्वेषण यंत्रणांनी डॉ. पाटणकर यांच्यावरच कारवाई करावी, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ?

सांगली – डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना सनातनी शक्तींनी गोळ्या घालून ठार मारले, अशी गरळओक श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केली.

सावळा मास्तर गोठणेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त केलेल्या जाहीर व्याख्यानात डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘स्त्रिया, तसेच कष्टकरी समाज यांचे शोषण होण्यासाठी जातीव्यवस्था कारणीभूत आहे. बौद्ध होणार्‍यांना गावागावांतून विरोध झाला; परंतु बौद्ध धर्मामुळेच जातीव्यवस्था नष्ट करणारी क्रांती झाली. कष्टकरी समाजाच्या मनातील जात जाण्यासाठी बौद्ध होणे, हाच उपाय होय.’’ (कधी नव्हे एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता असतांना जातीद्वेष पसरवणारी विधाने करून डॉ. पाटणकर हे हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, हेच यावरून लक्षात येते ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात