भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढा ! – धर्मप्रेमी हिंदूंची एकमुखी मागणी

बेळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

बेळगाव : म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान जम्मूपासून देहली, बंगाल, बिहार, तेलंगणा आदी अनेक राज्यांत घुसखोरी करून रहात आहेत. देशभरातील सामान्य नागरिकांमध्ये रोहिंग्यांविषयी संताप असून त्यांना देशात थारा देण्यात येऊ नये, अशीच त्यांची भूमिका आहे. रोहिंग्या मुसलमान म्यानमारमध्ये बौद्धांवर अत्याचार करत असल्याचे, तसेच त्यांचे ‘अल् कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुढे येत आहे. तरी आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे आणि भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. अंजेश कणंगलेकर यांनी केली.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ३१ ऑक्टोबर या दिवशी येथे करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.

या वेळी अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेच्या वतीने श्री. व्यंकटेश शिंदे आणि श्री. सचिन इनामदार, इस्कॉनचे श्री. सुदर्शन, धर्मप्रेमी श्री. अमित पैलवानचे आणि श्री. विजयानंद नेसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनाचा प्रारंभ श्री. व्यंकटेश शिंदे आणि श्री. सचिन इनामदार यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आला. आंदोलनात अभिनव हिंदु राष्ट्र संघटना, बजरंग दलाचे सर्वश्री विजय हुंदड, यल्लपा मिंदोलकर, परशराम हिरोजी, कर्तव्य महिला मंडळ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था अशा संघटनांचे ४५ हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. आंदोलन झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

विशेष

आंदोलनात सनातन प्रभातचे वाचक श्री. सूर्यकांत प्रभू आणि श्री. राजन अडुरकर हेही सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात