रायबाग (कर्नाटक) येथे सनातनच्या फिरत्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करतांना श्री. शशिकांत कुलगुडे

रायबाग (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या विशेष फिरत्या ग्रंथप्रदर्शनाचे ३० ऑक्टोबर या दिवशी ‘ब्राईट लॅड शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष श्री. शशिकांत कुलगुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रायबाग पोलीस ठाण्याच्या शेजारी हा धर्मरथ लावण्यात आला असून ३१ ऑक्टोबरअखेर हा रथ जिज्ञासूंना पहाण्यासाठी उपलब्ध असेल. या वेळी अय्यप्पा स्वामी मंदिराचे गुरुस्वामी श्री. सुरेश नाईक, धर्मप्रेमी श्री. जयदीप देसाई आणि सिद्धू देसाई, बजाज शोरूम’चे मालक श्री. प्रशांत बिरज उपस्थित होते. या रथास पोलीस उपनिरीक्षक श्री. रवी आजण्णावर यांनी भेट दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात