(म्हणे) विचारवंतांच्या हत्येमागे धर्मवेडी संस्था !

आयपीएस् अधिकारी मीरा चड्डा-बोरवणकर यांचा निराधार आरोप !

मीरा चड्डा-बोरवणकर

फोंडा – विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड्. गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि एच्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येमागे धर्मवेडी संस्था आहे. अजूनपर्यंत या संस्थेकडून चूक झाली नसली, तरी त्यांच्याकडून एखाद्या वेळी मोठी चूक घडेल आणि त्याच वेळी ही संस्था तावडीत सापडेल, असे मत आयपीएस् अधिकारी मीरा चड्डा-बोरवणकर यांनी व्यक्त केले, असे वृत्त दैनिक लोकमतच्या हॅलो गोवा पुरवणीत प्रसिद्ध झाले आहे. (मीरा चड्डा-बोरवणकर यांना ही संस्था कोणती ते ठाऊक असेल आणि त्यांच्याकडे तसे पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित पोलिसांना का सादर केले नाहीत ? यावरूनच त्यांचे वक्तव्य हे विशिष्ट धर्मविरोधी विचारसरणीने प्रभावित आहे, हे दिसून येते. एवढे पूर्वग्रहदूषित आणि दायित्वशून्य वक्तव्य करणे एका आयपीएस् अधिकार्‍याला शोभते का ? असे अधिकारी पोलीस खात्यात असल्यावर खरे खुनी कधी सापडतील का ? – संपादक)

म्युझियम ऑफ गोवा या संस्थेच्या वतीने ८ ऑक्टोबरला काही ठराविक लोकांसाठीच चड्डा-बोरवणकर यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात