प्लॅटफॉर्मच्या तिकीटात दरवाढ करणा-र्यांवर कठोर कारवाई करावी ! – सनातन संस्था

राऊरकेला (ओडिशा) येथे अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

टी. टाटा राव यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

राऊरकेला (ओडिशा) – प्रतिवर्षी मैहर (मध्यप्रदेश) आणि विंध्याचल (उत्तरप्रदेश) येथे होणार्‍या सुप्रसिद्ध नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे तिकिटावर लावलेला अधिभार अन्याय्य असून तो धार्मिक भेदभाव करणारा आहे. त्यामुळे ही दरवाढ रहित करून यात्रेकरूंना यात्रा काळात रेल्वे तिकीट दरात सवलत देण्यात यावी, तसे ही दरवाढ करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आल्या. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने येथील अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. त्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांचे स्वीय सचिव टी. टाटा राव यांना ते स्वीकारले. या वेळी धर्माभिमानी अधिवक्ता ब्रिजेश मिश्रा, अधिवक्ता विभूती भूषण पलेई, अधिवक्ता करमचंद जेना, सनातन संस्थेचे प्रेमप्रकाश कुमार आणि हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात