हिंदूंनो, स्वपराक्रमाने विजयादशमीचे ‘दशहरा’ हे नाव सार्थ करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘हिंदूंच्या देवतांसमोर दाही दिशा हरल्याचा दिवस म्हणजे ‘दशहरा’ (दसरा) !

हिंदूंनी दसर्‍याला विजयासाठी सीमोल्लंघन करायचे असते; पण आज काश्मीरपासून कैराणापर्यंत हिंदूच पराभवाचे सीमोल्लंघन करत आहेत. दसर्‍याचे शस्त्रपूजन करण्याची पुरुषार्थी परंपरा लुप्त झाल्याने चीनच्या सीमेवर युद्धज्वर असतांना भारतीय सैन्यात मनुष्यबळाचा तुटवडा दिसून येत आहे. दसर्‍याला विजयासाठी केले जाणारे अपराजितादेवीचे पूजन विस्मरणात गेले असतांना प्रत्येक रस्त्यावर ‘इसिस’चे हस्तक ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा देऊन युद्ध करण्याची सिद्धता करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी कर्मकांड म्हणून ‘दसरा’ साजरा करणे हास्यास्पद आहे.

हिंदूंनो, अंतर्मुख व्हा !

विजयादशमीला सीमोल्लंघन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन ही कृत्ये कर्मकांड म्हणून करू नका ! महिषासुरमर्दिनी श्री दुर्गादेवी आणि लंकाविजयी प्रभु श्रीराम यांच्या विजयाचे केवळ स्मरण करण्यापेक्षा त्यांच्या पराक्रमाची आणि विजयाची पुनरावृत्ती करून स्वपराक्रमाने विजयादशमीचे ‘दशहरा’ हे नाव सार्थ करा !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था (२०१७)