सनी लिओन आणि ‘मेन काईन्ड’ आस्थापन यांच्यावर कारवाई करावी !

देहली आणि धनबाद (झारखंड) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदु धर्माभिमान्यांची मागणी

देहली राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना धर्माभिमानी
धनबाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना धर्माभिमानी

देहली – हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवाच्या काळात गुजरातमध्ये ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखाण असलेल्या आणि वादग्रस्त अभिनेत्री सनी लिओन यांचे अश्‍लील छायाचित्र असलेल्या ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाचे मोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले. या माध्यमातून अभिनेत्री लिओन हिंदूंच्या सणाचे पावित्र्य भंग करत आहेत. त्यामुळे सनी लिओन आणि ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाची निर्मिती करणारे ‘मेन काईन्ड’ आस्थापन यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ सप्टेंबर या दिवशी देहली येथील जंतरमंतर येथे आणि २४ सप्टेंबर या दिवशी धनबाद (झारखंड) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धनबाद येथे हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाजसेवक स्वदेशी जागरण मंच यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

आंदोलनातील इतर मागण्या

१. बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने मोहरमच्या दिवशी श्री दुर्गादेवीच्या प्रतिमांच्या विसजर्नावर घातलेली बंदी तात्काळ उठवण्यात यावी.

२. लव्ह जिहादच्या विरोधात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी

३. उत्तरप्रदेशात हिंदूंची मंदिरे आणि हिंदूंचे उत्सव यांच्यावर निरंतर होत असलेल्या आघातांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात