शिवसेनेच्या कृतीशील शिवसैनिकांसाठी बोधन (तेलंगणा) येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन

मार्गदर्शन ऐकतांना हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमी

बोधन, इंदूर (तेलंगण) : येथे शिवसेनेच्या कृतीशील शिवसैनिकांसाठी १९ सप्टेंबर या दिवशी एक दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन जनार्दन आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. गोपीकिशन यांनी संबोधित केले.

या वेळी हिंदु राष्ट्राची मुलभूत संकल्पना, सुराज्य निर्मितीची आवश्यकता, हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळाचे महत्त्व, मनुष्य जीवनात साधनेचे महत्त्व इत्यादीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कोणते उपक्रम राबवले पाहिजे, हिंदु राष्ट्र संघटकाची आचारसंहिता कशी असावी, यांविषयीही या वेळी माहिती देण्यात आली.

क्षणचित्र

श्री. गोपीकिशन यांचा कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग

या कार्यशाळेत श्री. गोपीकिशन यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यामध्ये झालेले पालट, साधनेचे महत्त्व, धर्मशिक्षणाची आवश्यकता, चांगला कार्यकर्ता बनण्यासाठी आपल्यात कोणते गुण असायला हवे ? आदींविषयी  विस्तृतपणे माहिती दिली. यासमवेतच त्यांनी उपस्थितांकडून उपक्रमांचे नियोजनही करवून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात