हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवू पहाणार्‍या ममता बॅनर्जी यांना धडा शिकवावा ! – विनोद शिंदे, हिंदु जनजागृती समिती

एरंडोल (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव : हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवू पहाणार्‍या आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळणार्‍या ममता बॅनर्जी यांना आता हिंदूंनी धडा शिकवायला पाहिजे. तसेच ‘लव्ह जिहाद’चा विषय गांभीर्याने घेऊन त्याचा देशपातळीवर बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी केल्या. येथील एरंडोल शहरातील बस स्थानकाजवळ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यानंतर तहसीलदारांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री प्रदीप पाटील, रवी पाटील (मराठखेडा) भगवान, योगेश वाघ, राजेंद्र भालेराव, राहुल धनगर, दिलीप मराठे, सनातन संस्थेचे श्री. प्रल्हाद सोनवणे, रणरागिणी शाखेच्या सौ. साधना पाटील, तसेच अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. आंदोलनापूर्वी परिसराची स्वच्छता करतांना गोमाता आली. तिच्या गोमूत्राद्वारे शुद्धी झाल्याचे जाणवून सर्वांची भावजागृती झाली.

२. अांदोलनाच्या समोरच एक विक्रेता उभा होता. पोलिसांनी स्वतःहून त्याला बाजूला केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात