रामवाडी (पेण) येथे ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात सनातन संस्थेद्वारे मार्गदर्शन

‘सनातन संस्था चेन्नई’ न्यासाचा उपक्रम

मार्गदर्शन ऐकतांना विद्यार्थी

पेण : रामवाडी येथील शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘सनातन संस्था चेन्नई’ न्यासाच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. जांभळे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी शाखेच्या २ शिक्षकांनी, तसेच ५० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

क्षणचित्र : मार्गदर्शनाला उपस्थित शिक्षकांनी सनातनचे साधनेविषयी माहिती देणारे ४ ग्रंथ घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात