निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपतहसीलदारांना निवेदन

‘लव्ह जिहाद’ विरोधात कठोर कारवाई करा आणि पश्‍चिम बंगालमधील श्री दुर्गादेवी मूर्ती विसर्जनावरील बंदी उठवा

(१) उपतहसीलदार श्री. एन्.बी. गेज्जी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

निपाणी  – ‘लव्ह जिहाद’ ही समस्या आता जागतिक झाली आहे. या समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करतांना कठोर कारवाई करा. मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली बंदी उठवावी, अशा विषयांची निवेदने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ सप्टेंबरला येथील उपतहसीलदार श्री. एन्.बी. गेज्जी यांना देण्यात आली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ : श्रीराम सेनेचे सर्वश्री राजू कोपार्डे, उत्तम कामते, सनातन  संस्थेच्या सौ. अलका पाटील, सौ. शोभा हगरगी, श्री. रमेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, धर्मप्रेमी सर्वश्री महेश मठपती, प्रकाश मठपती, संदीप जाधव, आकाश कांबळे, अक्षय हुसाले, प्रथमेश साळुंखे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात