लोकशाहीतील निरर्थकता लक्षात येईल, तेव्हाच समाज हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल होईल ! – श्री. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत प्रसारसेवक, सनातन संस्था

कतरास (झारखंड) येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन

डावीकडून श्री. नीलेश सिंगबाळ आणि मार्गदर्शन करतांना श्री. नागेश गाडे

कतरास (झारखंड) – हिंदु राष्ट्र हे एक प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या आदर्श वृत्तीच्या व्यक्तींचे एकत्रिकरण आहे. त्यामुळे त्याची पायाभरणी आदर्शवतच असायला हवी. हिंदूंच्या त्यागावर उभ्या राहिलेल्या हिंदु राष्ट्रातही अन्य राजकीय पक्षांसारखे राज्य निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक हिंदु संघटक कार्यकर्त्याने स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून, स्वतःच्या संघटनेपासून आदर्श कृतीचा पायंडा पाडायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी कतरास येथे झालेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना केले. झारखंड-कतरास येथील राजस्थानी समाज मारवाडी धर्मशाळा येथे हिंदु जनजागृती समीतीने ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत दोन दिवसांच्या निवासी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत आसाम, बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांतील धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते. हिंदु राष्ट्र संघटकाची आचारसंहिता काय असावी ?, यासंदर्भात बोलतांना श्री. गाडे यांनी स्वभावदोष-निमूर्र्लन प्रक्रियेचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, आदर्श संघटक म्हणून हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करतांना व्यसनाधीनता, अपशब्द वा शिवराळ भाषेचा वापर, वक्तशीरपणाचा अभाव, अतीआत्मविश्‍वास आणि भावनाशीलता, बेशिस्त, प्रसिद्धीलोलुपता यांसारखे आजच्या राजकाराणी नेत्यांकडे असणारे घातक दोष आपल्यात असू नयेत, यासाठी प्रत्येकाने सतत प्रयत्नशील रहायला हवे अन्यथा राजकारणी आणि आपण यांत फरक काय ?

 

लोकशाहीतील निरर्थकता लक्षात येईल, तेव्हाच समाज हिंदु
राष्ट्रासाठी अनुकूल होईल ! – श्री. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत प्रसारसेवक, सनातन संस्था

कार्यशाळेच्या समारोपाच्या वेळी मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे पुर्वोत्तर भारत प्रसारसेवक श्री. नीलेश सिंगबाळ म्हणाले भारतात विद्यमान परिस्थितीत ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याचे मुख्य कारण आपली धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. धर्मनिरपेक्षेमुळे शासकीय यंत्रणांमध्ये भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, अनैतिकता आदी दुष्प्रवृत्ती प्रबळ झाल्या आहेत. जगातील सर्वांत मोठी लोकशाही तेवढीच ती अपयशी ठरली आहे. जेव्हा समाजाला प्रस्थापित लोकशाहीतील निरर्थकता लक्षात येईल, तेव्हाच समाज हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल होईल. हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. समितीचे राजस्थान-मध्यप्रदेशचे राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी हिंदु राष्ट्र : मूलभूत संकल्पना या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. सलोनी सिंह आणि कु. प्रतिनिधी सिंह यांनी केले.

क्षणचित्र : राजस्थानी मारवाडी समाजाकडून कार्यशाळेसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात