गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातनच्या विरोधात जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न

‘आज तक’ वृत्तवाहिनीकडून सनातनची अपकीर्ती करणारे वृत्त
प्रसारित अन्य प्रसारमाध्यमांकडून त्याचीच री ओढण्याचा प्रयत्न

समाजाची दिशाभूल करणारी
वृत्ते देणारी प्रसारमाध्यमे जनतेला दिशा काय देणार ?

मुंबई : ‘गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातनचीही चौकशी करण्यात येत आहे’, अशा प्रकारचे धादांत खोटे आणि सनातनची अपकीर्ती करणारे वृत्त ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. या वृत्तामुळेच एका राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्राच्या आणि राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सनातनशी संपर्क करून ‘कर्नाटक पोलीस गौरी लंकेश प्रकरणात रामनाथी येथील सनातन आश्रमात आल्याची अफवा येथे पसरली आहे. तसे काही झाले का ?’ असे विचारले. स्थानिक पोलिसांनीही ‘आश्रमात कर्नाटकचे पोलीस आले होते का?’, असे विचारले.

त्याचप्रमाणे सकाळी मुंबई येथे एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना संपर्क करून ‘गोव्यातील सनातनच्या आश्रमात कर्नाटक पोलीस आले आणि त्यांनी एकाला कह्यात घेतले’, हे खरे आहे का ?’, असे विचारले. (यावरून सनातनच्या विरोधात पद्धतशीरपणे अफवा पसरवून सनातनद्वेष्ट्यांकडून सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यात येत आहे. याविषयी कायदेशीर कारवाईसाठी सनातन अधिवक्त्यांचे समुपदेशन घेत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात