भोरवासियांचा आदर्श सर्वत्रच्या गणेशभक्तांनी घेऊन शास्त्रोक्त कृती करणे आवश्यक !

भोरवासियांनी (जिल्हा पुणे) ७ व्या दिवशी जपली गौरी आणि गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा !

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम

भोर – गेल्या १२ वर्षांपूर्वी अंनिसने मूर्तीदान मोहिमेचा प्रारंभ येथून केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात भोर पटर्न या नावाने मूर्तीदान ही अशास्त्रीय मोहीम राबवली होती. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनामुळे गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा कायम ठेवत यंदाही भोरवासियांनी ३१ ऑगस्टला वहात्या पाण्यात गौरी आणि गणेशमूर्ती यांचे विसर्जन केले आणि अंनिसच्या मूर्तीदानाच्या बालेकिल्ल्याला मूठमाती दिली. या वर्षीही समितीच्या वतीने राजवाडा चौकातील शनिघाट, निरामाता घाट, रामबाग ओढा आणि शहर भाग येथे भित्तीपत्रके अन् हस्तपत्रके यांद्वारे जागृती केली. त्याला गणेशभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यंदाच्या वर्षी नगरपालिकेने निर्माल्य नदीमध्ये विसर्जित केले जाऊ नये, यासाठी प्लास्टिकच्या कचर्‍याचे मोठे डबे (कंटेनर) घाटाच्या ठिकाणी ठेवले होते.  प्रदूषणाचा कांगावा करणारे पर्यावरणवादी आणि अंनिसचे कार्यकर्ते विसर्जन घाटाकडे फिरकले नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात