भोपाळमध्ये श्री गुजराती समाजाच्या बैठकीत सनातन संस्थेकडून धर्मशिक्षण

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. संध्या आगरकर

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील गुजराती समाजाच्या कार्यकारणी बैठकीत सनातन संस्थेच्या सौ. संध्या आगरकर आणि सौ. शैला काळे यांनी धर्मशिक्षणाविषयी माहिती दिली. या वेळी कार्यकारणीचे अध्यक्ष श्री. संजय पटेल, उपाध्यक्ष श्री. मनोज झा, सचिव श्री. कपिल सोनी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. कार्यकारणीने नवरात्रोत्सवात धर्मशिक्षण प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यासाठी संस्थेला आमंत्रित केलेे. या समवेतच शहरातील गुजराती समाजाशी संबंधित प्रत्येक घरी धर्मशिक्षण पोहचण्यासाठी ‘सनातन पंचांग २०१८’ घरोघरी पोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

भोपाळमध्ये रविदास कॉलनीतील नागरिकांना प्रबोधन

भोपाळ – सनातन संस्थेच्या वतीने येथील रविदास कॉलनीतील नागरिकांना धर्मशिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सनातनच्या सौ. संध्या आगरकर यांनी ‘देवतांना नमस्कार कसा करावा ?’, ‘वाढदिवस तिथीनुसारच का साजरा करावा ?’ इत्यादी विषयांवर माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात