कल्याण येथे धर्मप्रेमींची कार्यशाळा

उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना कार्यशाळेतील धर्मप्रेमी

कल्याण – येथे २४ ऑगस्टला धर्मप्रेमींसाठी एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला, तर श्री. सागर चोपदार यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व विशद केलेे. आंदोलनाला अनुमती घेणे आणि हिंदु धर्मसभेसाठी व्यावसायिकांकडून अर्पण कसे घ्यावे या संदर्भात श्री. सागर चोपदार यांनी प्रायोगिक भाग घेतला. या वेळी नामजप, सूक्ष्मातील प्रयोग आणि गटचर्चा घेण्यात आली.

 

क्षणचित्रे

१. धर्मप्रेमी श्री. सागर शुक्ल हे १२ आणि १३ ऑगस्टला उल्हासनगर येथे झालेल्या कार्यशाळेतही सहभागी झाले होते. त्यांच्या पुढाकाराने ही दुसरी कार्यशाळा पार पडली.

२. कार्यशाळेसाठी आयकॉन प्लाझा या सभागृहाचे मालक श्री. समर्थ वखरे यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात