आजोती (तालुका पंढरपूर) येथील होळकर विद्यालयात सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि सुसंस्काराचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन !

आजोती (तालुका पंढरपूर) – सुसंस्कार आणि चांगल्या सवयी अंगीकारून आपले जीवन सुसंस्कारित करणे आणि स्वत:तील दोष घालवून गुण वाढवणे. तसेच राष्ट्र आणि धर्माप्रतीचे कर्तव्य कसे पार पाडावे या विषयी आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अवगत केले. येथील मातोश्री रुक्मिणी गंगाराम होळकर विद्यालयात सनातन संस्थेच्या वतीने १९ ऑगस्ट या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘सुसंस्काराचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मुख्याध्यापक श्री. शेरकर यांसह शिक्षक आणि २०० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक श्री. राम घाटुळे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सचिन लाडे यांनी केले. श्री. कपिल घाटुळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

क्षणचित्रे

१. श्री. राम घाटुळे (वय ८४ वर्षे) हे २ किलोमीटर अंतरावरून प्रवचनासाठी उपस्थित राहिले आणि ‘असे कार्यक्रम वारंवार आयोजित केले जावेत. आम्ही सर्व सहकार्य करू’, असे सांगितले.

२. या वेळी मुख्याध्यापक श्री. शेरकर यांनी १ सहस्त्र रुपयांचे ग्रंथ खरेदी केले.

३. मुख्याध्यापक श्री. शेरकर यांनी ‘सनातन संस्थेचे उपक्रम नेहमी स्तुत्य असून समाजाला कृतीप्रवण करणारे आहेत. अशा उपक्रमाची सद्यस्थितीला आवश्यकता आहे. आम्ही आवश्यक ते सहकार्य निश्‍चितपणे करू’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात