कोथरूड आणि सिंहगड रस्ता (पुणे) येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा धर्मकार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

सिंहगड रस्ता येथील बैठकीत सहभागी वाचक

पुणे – ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध आहे. ईश्‍वर आणि संत यांच्या आशीर्वादाच्या बळावर साधना म्हणून चालू असलेल्या या दैनिकाचा मुख्य उद्देश समाजात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे जागरण करणे हा आहे. सनातन प्रभात हे केवळ वर्तमानपत्र नसून समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे. त्याचा प्रत्यय येथील कोथरूड आणि सिंहगड रस्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या वाचकांच्या बैठकीमध्ये आला. वाचकांना साधनेची पुढची दिशा देणे आणि त्यांचा धर्मकार्यात सहभाग करवून घेणे, या उद्देशाने कोथरूड आणि सिंहगड रस्ता येथे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी वाचकांनी त्यांच्या साधनाविषयक शंकांचे निरसन करून घेतले, तर धर्मकार्यामध्ये विविध माध्यमांतून सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. २० ऑगस्टला कोथरूड येथे आयोजित केलेल्या बैठकीच्या दिवशी दिवसभर पुष्कळ पाऊस पडत होता, तरीही वाचक बैठकीला उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी मिळून २५ जण बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

१. कोथरूड येथील एक वाचक सौ. रेखा पाटणकर रिक्शासाठी अतिरिक्त पैसे देऊन बैठकीला आल्या. ‘नेहमी काही तरी अडचण येते. त्यामुळे काहीही झाले, तरी बैठकीला जायचेच, असे मी ठरवले आणि देवाच्या कृपेने येऊ शकले’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बैठकीनंतर शंकानिरसन झाल्याने त्या पुष्कळ सकारात्मक होत्या, तसेच त्यांना कृतज्ञता वाटत होती. त्यांनी तसा भाव व्यक्तही केला.

२. काही जणांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण सेवा म्हणून करण्याची, तसेच प्रबोधनपर हस्तपत्रके वितरण करण्याची सिद्धता दर्शवली.

३. सिंहगड रस्ता येथे झालेल्या बैठकीमध्येही वाचकांनी साधनेविषयी मोकळेपणाने चर्चा केली. आध्यत्मिक पातळी, अनुभूती, नामजप एकाग्रतेने कसा करावा यांविषयी जिज्ञासेने जाणून घेतले.

४. १० वाचकांनी आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत सेवा विसर्जन घाटांवर प्रबोधनासाठी येण्याची, प्रबोधन कक्षावर येण्याची उत्स्फूर्त सिद्धता दर्शवली.

५. कोथरूड येथे पावसामुळे काही वाचक बैठकीला येऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी स्वतःहून तसे आयोजकांना कळवले. ‘पावसामुळे बैठकीला येऊ शकलो नाही, तरी पुढच्या बैठकीला नक्की येऊ’, असे ते म्हणाले.

६. दोन्ही ठिकाणी साधकांनी बैठकीची भावपूर्ण सिद्धता केली होती. त्यामुळे ‘बैठकीला आल्यावर चांगले वाटत आहे, मनाला शांत वाटत आहे’, असे काही वाचकांनी सांगितले.

७. कोथरूड येथे श्री. प्रवीण नाईक आणि सौ. रश्मी नाईक यांनी, तर सिंहगड रस्ता येथे श्री. कृष्णाजी पाटील आणि आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी बैठक घेतली.

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’या उपक्रमातही वाचकांचा सहभाग !

१५ ऑगस्टच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतीवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ हा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमाच्या अंतर्गत सौ. उमा जगदाळे यांनी ८ सार्वजनिक फलकांवर, तर सौ. कला जगताप यांनी २ सार्वजनिक फलकांवर साधकांच्या साहाय्याने प्रबोधनपर लिखाण केले. सौ. विद्या वैद्य यांनी त्यांच्या परिसरात प्रबोधनपर हस्तपत्रक लावले. सेवांच्या माध्यमातून आनंद अनुभवल्याचे त्यांनी सांगितले. (कृतीशील वाचक हीच ‘सनातन प्रभात’ची शक्ती ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात