सनातन संस्थेकडून कर्नाटकातील उडुपी येथील धर्मप्रेमी अन् प्रशासकीय अधिकारी यांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले

मूडबिद्रे (जिल्हा उडुपी) येथे पोलीस निरीक्षकांना राखी बांधतांना समितीची कार्यकर्ती

शिवमोग्गा (कर्नाटक) : रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, शिकारीपूर येथील पोलीस उपअधीक्षक, तसेच सागर आणि तीर्थहळ्ळी येथील तहसीलदार यांना राखी बांधण्यात आली.

उडुपी येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने येथील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले, तसेच मूडबिद्रे येथील हिंदुत्वनिष्ठांसह पोलीस निरीक्षक यांनाही राखी बांधण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात