अकोला येथे हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळा !

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याकडून ‘साधनेचे
जीवनातील महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयांवर शिबिरार्थींना मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना (डावीकडून) श्री. चेतन राजहंस आणि सद्गुरु नंदकुमार जाधव

अकोला : येथील जानोळकर मंगल कार्यालयात २ दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. माधवी चोरे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश सांगितला. सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘साधनेचे जीवनातील महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयांवर शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.  श्री. चेतन राजहंस यांनी अध्यात्म, प्रारब्धानुसार मानवाला होणारे शारीरीक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास, त्यांवरील उपाय, साधनेचे महत्त्व यांविषयी उदाहरणांसहित सांगितलेे. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयावर शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जलद आध्यात्मिक उन्नती आणि ईश्वारप्राप्ती करता येते. काळानुसार कोणती साधना करावी, कोणता नामजप करावा, कुलदेवी आणि दत्त यांचे नामजप अन् व्यष्टी, तसेच समष्टी यांचे महत्त्व मार्गदर्शनातून शिबिरार्थींना सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात