चोपडा (जळगाव) येथील पोलीस निरीक्षकांचा हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद

मोहिमेत सनातन संस्थेचा सहभाग

ध्वनीफीत पहातांना डावीकडून पोलीस निरीक्षक श्री. किसनराव पाटील आणि मनसेचे तालुकाप्रमुख अनिल वानखेडे

जळगाव : येथील पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव आणि अपप्रकार ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी उपस्थित पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक श्री. किसनराव पाटील यांना ही ध्वनीचित्रफीत आवडली. ते म्हणाले, गणेशोत्सवात शाडूच्या मातीची मूर्ती, आध्यात्मिक गाणी, भजने, नामजप या चांगल्या संकल्पना आहेत. ही फीत आपण सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीत दाखवू. पोलिसांनी तातडीने बैठक बोलवून सर्व गणेशोत्सव मंडळे, नगरसेवक, सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बोलवले आणि ही ध्वनीचित्रफीत दाखवली.  या वेळी सनातनच्या साधिका कु. जयश्री पाटील यांनी श्री गणेशमूर्ती शाडूच्या मातीची का असावी ? याविषयी विश्लेषण केले, तर समितीचे श्री. यशवंत चौधरी यांनी गणेशोत्सवाच्या बैठकीत आदर्श गणेशोत्सव कसा असावा या विषयीची सूत्रे मांडली.  दिव्य मराठीचे पत्रकार श्री. प्रवीण पाटील यांनाही हा विषय आवडल्याने ध्वनीचित्रफीतीमधील सर्व माहिती घेऊन चांगली बातमी देऊ, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात