भारताच्या सीमेवर चीनचे संकट वाढत असल्याने ते दूर होण्यासाठी करावयाचा मंत्रजप दिवसभरामध्ये १०८ वेळा करावा !

प.पू. पांडे महाराज

 

 

 

Download 

अ. मंत्रजप पुढीलप्रमाणे आहे.

निर्हस्त: शत्रुरभिदासन् अस्तु, ये सेनाभिर्युधमायन्त्यस्मान् ।

समर्पयेन्द्र महता वधेन, द्रात्वेषाम् अघहारो विविद्ध: ॥ (संदर्भ : अथर्ववेद, कांड ६, सूक्त ६६)

अर्थ : आम्हाला त्रास देण्यासाठी येणार्‍या शत्रूंचे सामर्थ्यच नष्ट होवो. हे इंद्रदेवा, जे शत्रू स्वतःच्या सैन्यासह आमच्यावर चाल करून येत आहेत, ते तुझ्या वज्राने मारले जाऊ देत. त्यांच्या नेत्याचा नाश होऊन त्याला वाईट गती प्राप्त होऊ दे.

आ. हा मंत्रजप दिवसभरामध्ये केव्हाही किंवा विभागून १०८ वेळा करू शकतो.

इ. हा मंत्रजप १०८ वेळा म्हणण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी अंदाजे ३८ मिनिटे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या वेळेनुसार १ किंवा २ वेळा विभागून एकूण ३८ मिनिटे ऐकावा. हा मंत्रजप ज्यांना म्हणणे शक्य आहे, त्यांनी तो म्हणावा. म्हणणे (मंत्रांचा उच्चार करणे) शक्य नसल्यास ध्वनी (ऑडिओ) ऐकावा.

ई. मंत्र म्हणण्यापूर्वी इंद्रदेवतेला प्रार्थना करावी, हे इंद्रदेवा, भूतान, चीन आणि भारत यांच्या सीमारेषेवर असलेल्या डोकलाम येथे मोठ्या प्रमाणात चीनचे सैन्य भारतावर आक्रमण करण्यासाठी उभे आहे. हे इंद्रदेवा, चीनचे सैन्य पीडित होऊन पळून जावे, जेणेकरून भारतीय सैन्य आणि आम्ही भारतीय सुरक्षित राहू.

उ. मंत्रजपाचा ध्वनी (ऑडिओ) लावल्याने या मंत्रजपाची स्पंदने वातावरणात पसरून त्याची शक्ती कार्यरत होते. त्यामुळे जरी हा मंत्रजप म्हणता आला नाही, तरी प्रतिदिन ऐकण्यासाठी प्राधान्य द्यावे आणि अधिकाधिक राष्ट्रप्रेमीपर्यंत पोहचवावा.

साधकांना सूचना : हा मंत्रजप तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी, तसेच आध्यात्मिक उपाय म्हणून बसून नामजप करणार्‍या साधकांनी म्हणू किंवा ऐकू नये.