मनुष्याच्या जीवनातील पीडा दूर होऊन त्याचे जीवन सुखी होण्यासाठी प्राणी आणि पक्षी यांना आपल्या हाताने अन्न खायला घालण्याचे सांगितलेले उपाय

(सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

आम्ही राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यामध्ये असलेल्या परशुराम गुहेमध्ये गेलो होतो. तेथे भिंतीवर प्राणी आणि पक्षी यांना आपल्या हाताने अन्न खायला घातल्यावर आपल्याला काय लाभ होतात ?, हे लिहिले होते. ते येथे देत आहे.

१. गायीला चारा खायला घालणे

ग्रहपीडा दूर होते

पोटात ३३ कोटी देवता असणार्‍या गोमातेला आपल्या हाताने हिरवा चारा भरवल्यावर आपली ग्रहपीडा दूर होते, याची अनुभूती सनातनची साधिका कु. दीपाली मतकर हिने घेतली आहे. ती एका आजारामुळे अगदी मृत्यूशय्येवर असतांना तिला हा उपाय महर्षि भृगु यांनी सांगितला होता आणि त्याचा तिला लाभ झाला.

२. पक्ष्यांना (उदा. कबुतराला) दाणे खायला घालणे

चाकरी-धंदा चांगला चालतो.

३. कुत्र्याला पोळी खायला घालणे

आपले शत्रू दूर पळतात

मी वाराणसीला गेले असता तेथे एका साधूने मला सांगितले, शनिवारी स्वतःच्या डोक्यावरून तीनदा पेढा ओवाळून तो काळ्या कुत्र्याला खायला घाला. यामुळे वाईट शक्तींचे आक्रमण दूर होऊन कार्यात यश येईल. थोडक्यात, कुत्र्याला खायला घातल्याने आपल्यावरील शत्रूपीडा दूर होते.

४. मुंग्यांना गव्हाचे पीठ खायला घालणे

आपले कर्ज न्यून (कमी) होते

एका साधिकेला सप्तर्षि जीवनाडीपट्टीमध्ये महर्षींनी मुंग्यांना गव्हाचे पीठ आणि साखर घाला, असे सांगितले होते.

५. माशांना कणकेचे छोटे गोळे खायला घालणे

गेलेली समृद्धी परत येते

तळे, नदी येथे बरेच जण हा उपाय करतांना दिसतात.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (३१.५.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात