दैनिक नवभारतचे मुंबई आवृत्तीचे संपादक श्री. ब्रजमोहन पांडेय यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

डावीकडून श्री. शशिकांत राणे, श्री. ब्रजमोहन पांडेय आणि श्री. रूपेश रेडकर

रामनाथी (गोवा) : दैनिक नवभारतचे मुंबई आवृत्तीचे संपादक श्री. ब्रजमोहन पांडेय यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. रूपेश रेडकर यांनी त्यांना आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

सनातन संस्था तिचा संकल्प पूर्ण करेल !
– श्री. ब्रजमोहन पांडेय, संपादक, दैनिक नवभारत, मुंबई आवृत्ती

मला आश्रमात अतिशय चांगले वाटले. येथील व्यवस्था अतिशय उत्तम आहे. जेथे स्वस्थ वातावरण असते, तेथे आत्मा विराजमान असतो. गुरुजींनी जे ध्येय ठेवले आहे, त्या दिशेने साधक पुढे जात आहेत, असे मला वाटले. ही संस्था ज्या उद्देशाने पुढे जात आहे, ते पाहून संस्था हळूहळू तिचा संकल्प पूर्ण करेल आणि धर्माचा विजय होईल, याची मला खात्री आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात