आनंदाची उधळण करणार्‍या भावसोहळ्यातील काही अनमोल क्षण !

समष्टीत सदा गुरुरूप पाहूनी ।

ओजस्वी वाणीने समष्टीस जिंकूनी ।

समष्टीसाठीच चंदनापरी झिजूनी ।

जाहले आरूढ आज सद्गुरुपदी ।

कोटी कोटी प्रणाम चराचरातूनी ॥

 

श्रीगुरूंच्या कीर्तीची विजयपताका ।

दूर-दूरच्या प्रांतांत पोहोचवतांना ।

अवचित मिळे असा आनंदठेवा ।

भावानंद वर्णाया शब्दकोशही थिटा पडावा

परात्पर गुरूंचा महिमा आम्ही काय वर्णावा ॥

सद्गुरु नंदकुमार जाधव (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

पू. जाधवकाका भासती तेजस्वी ऋषी ।

मुखावरील भाव पहाता निःशब्द होते वाणी ॥

या वयातही तुमची समष्टी तळमळ पाहूनी ।

अनन्य वंदन करतो सद्गुरु काकांच्या चरणी ॥

निर्मळ हास्य मुखावरी । कांती असे बहु तेजस्वी । संपादली कृपा श्रीगुरूंची । आभा फाकली पहा सद्गुरूंची ॥
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (डावीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

निःशब्द भावावस्था अन् कृतज्ञता ।

श्रीगुरूंच्या कोमल चरणी अर्पितांना ।

भक्ती-भाव दाटूनी येई समष्टीचा ।

कोटी कोटी प्रणाम सद्गुरुद्वयींना ॥