अमरावती येथे बालसंस्कारवर्ग शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

अमरावती : येथील सनातनच्या सेवाकेंद्रामध्ये बालसंस्कार वर्गाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मुलांनी स्वतः बनवलेले विज्ञानाचे नमुने असलेली चित्रे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण, लक्ष्मीदेवी यांच्या चित्रांचेही प्रदर्शन भरवण्यात आले होते. कु. स्नेहल कांबळे आणि सौ. कंचन शर्मा यांनी शिबीर घेतले. शिबिरात मुलांना राष्ट्र आणि धर्म यांवरील कथा, तसेच नैतिक मूल्यांचे महत्त्व सांगण्यात आले.

बालशिबिरार्थींनी लावलेले प्रदर्शन

पू. अशोक पात्रीकर यांच्याकडून मुलांचे कौतुक

सनातनचे पू. अशोक पात्रीकर यांनी मुलांनी लावलेले प्रदर्शन बघून त्यांचे कौतुक केले, तसेच मुलांना स्वतः प्रसाद वाटप केले. ‘लहान वयात मुलांना हे सुचणे कौतुकास्पद आहे’, असे पू. पात्रीकरकाका यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात