सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसांचे सूक्ष्म परीक्षण

१. ‘विदेशातील हिंदूंवर होणारी आक्रमणे’, या विषयी विदेशातून आलेले
मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करत असतांना आलेली अनुभूती

१५.६.२०१७ या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी ‘विदेशातील हिंदूंवर होणारी आक्रमणे’, याविषयी विदेशातून आलेले मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करत असतांना पाताळातील आक्रमक अनिष्ट शक्तींनी साधकांवर आक्रमण केले. त्यामुळे विषय ऐकतांना ग्लानी येणे, विषयाचे आकलन न होणे आणि मनाला अस्वस्थता जाणवणे, यांसारखे त्रास साधकांना होत होते. भगवान श्रीकृष्णाने सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी त्यांच्याभोवती सूक्ष्मातून सुदर्शनचक्र कार्यरत ठेवले. संबंधित विषय संपल्यानंतर होणार्‍या आक्रमणांची तीव्रता उणावली.

२. ‘दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसांचे अधिवेशन निर्विघ्नपणे
संपन्न व्हावे अन् अधिवेशनाला उपस्थित असणारे धर्माभिमानी अन् हिंदू
यांवर आक्रमणे होऊ नयेत’, यांसाठी अष्टभैरव अन् अष्टांबा कार्यरत असणे

‘दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसांचे अधिवेशन निर्विघ्नपणे संपन्न व्हावे अन् अधिवेशनाला उपस्थित असणारे धर्माभिमानी अन् हिंदू यांवर स्थुलातून आक्रमणे होऊ नयेत’, यासाठी असितांग, रुरु, चण्ड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार या अष्टभैरवांनी कार्यक्रम स्थळाभोवती संरक्षककडे निर्माण केले. त्यांना रुद्रशिखा, रुद्रचण्डी, नटेश्‍वरी, महालक्ष्मी, सिद्धचामुण्डिका, सिद्धयोगेश्‍वरी, भैरवी आणि रूपविद्या या अष्टांबांनी साहाय्य केले.

३. वैकुंठातून भूमीवर तेज आणि शंखध्वनी यांच्या रूपाने
येणार्‍या धर्मशक्तीचा प्रवाह भारतामध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदू
अधिवेशनाच्या कार्यस्थळी आकृष्ट होऊन विविध तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून कार्यरत होणे

त्यामुळे हिंदूंना आलेली मरगळ आणि धर्माला आलेली ग्लानी दूर होऊ लागणे : सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या कालावधीत वैकुंठातून भूमीवर तेज आणि शंखध्वनी यांच्या रूपाने येणार्‍या धर्मशक्तीचा प्रवाह भारतामध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या कार्यस्थळी आकृष्ट झाला आणि तो अधिवेशनाच्या माध्यमातून कार्यरत झाला. या धर्मशक्तीचा प्रवाह भारतातील विविध शक्तीपिठे, श्रीगणेशाची साडेतीन पिठे, दत्तपीठ, क्षेत्रपाल आणि ज्योतिर्लिंग यांनी ग्रहण केले. त्यामुळे संपूर्ण भारतावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होऊन भारतरूपी राष्ट्रपुरुषाची आणि धर्मरूपी धर्मपुरुषाची सुषुम्नानाडी जागृत झाली. त्याचा परिणाम भारतभरात विविध ठिकाणी रहाणार्‍या हिंदूंवर होऊन सर्वत्रचे हिंदू कृतीप्रवण होण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि शक्ती मिळाली. त्यामुळे हिंदूंना आलेली मरगळ आणि धर्माला आलेली ग्लानी दूर होऊ लागली अन् हिंदू धर्मरक्षणाचे कार्य करण्यासाठी सिद्ध झाले.

४. देशाच्या सीमेवर स्थित असणार्‍या विविध सीमावर्ती
देवतांनी धर्मचैतन्याचा प्रवाह ग्रहण केल्यामुळे त्यांची कर्मेंद्रिये जागृत होणे

धर्मचैतन्याचा प्रवाह देशाच्या सीमेवर स्थित असणार्‍या विविध सीमावर्ती देवतांनी ग्रहण केल्यामुळे त्यांची कर्मेंद्रिये जागृत होऊन ते राष्ट्ररक्षण करण्यासाठी सज्ज झाले. यामध्ये तनोटमाता, गणपतीची क्षेत्रे आणि शिवाची उपरूपे कार्यरत झाली. त्यामुळे भारतावर विविध सीमांमधून होणारी सूक्ष्मातील आक्रमणे थोपवली जात होती.

५. विविध दिशांमधून होणारी आक्रमणे
थोपवण्यासाठी अष्टवसु आणि अष्टदिक्पाल सक्रीय होणे

विविध दिशांमधून होणारी आक्रमणे थोपवण्यासाठी अष्टवसु आणि इंद्र, यम, वरुण, कुबेर, अग्नि, निऋति, वायू आणि ईशान हे अष्टदिक्पाल सक्रीय झाले. त्यांच्या साहाय्यासाठी शिवगण सैनिकांच्या रूपाने सिद्ध झाले. ‘त्यामुळे अधिवेशनाच्या ठिकाणी देवसैन्य तैनात झाले आहे’, असे जाणवले. (या वेळी वातावरणात कापूर आणि बुक्का यांचा सुगंध दरवळत होता.)

६. भूमीची सात्त्विकता वृद्धींगत करण्यासाठी अष्ट लोकपाल कार्यरत होणे

भारतावर (भूलोकावर) उच्च लोकांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य भारतभूमीने ग्रहण करावे आणि भारताची सात्त्विकता वाढावी यासाठी सूर्य, चंद्र, अग्नी, वायु, पर्जन्य, इंद्र, यम आणि कुबेर हे अष्ट लोकपाल कार्यरत झाले.

७. भारतातील सप्तबद्रींमुळे अखिल भारतीय हिंदू
अधिवेशनाला उच्च देवतांचे कृपाशीर्वाद लाभण्यास साहाय्य मिळणे

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उच्च देवतांचे कृपाशीर्वाद लाभून त्यांचे साहाय्य मिळण्यासाठी भारतातील श्रीबद्रीनारायण, आदिबद्री (उरग्रम ग्राम यालाच ध्यानबद्री असेही म्हणतात), वृद्धबद्री, भविष्यबद्री, योगबद्री, आदिबद्री (कैलासाच्या मार्गावरील) आणि नृसिंहबद्री या सप्तबद्रींनी हे चैतन्य ग्रहण करून त्याचे भारत आणि संपूर्ण पृथ्वी यांवर प्रक्षेपण केले.

८. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील विघ्ने
दूर होण्यासाठी श्रीगणेशासह अन्य देवता कार्यरत होणे

अखिल भारतीय हिंदू अधिवेनातील विघ्ने दूर होण्यासाठी कलियुगात कार्यरत असणारा श्रीगणेशाचा धूम्रकेतु हा अवतार आणि भारतातील श्रीगणेशाची साडेतीन शक्तीपिठे, देवीची ५१ पिठे आणि बारा ज्योतिर्लिंगे यांमध्ये कार्यरत असणारी दैवी शक्ती सक्रीय होऊन कार्यरत झाली.

अशा प्रकारे हिंदू अधिवेशनासाठी ३३ कोटी देवतांची शक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने कार्यरत झाली. श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेचा उचललेल्या गोवर्धन पर्वताला ३३ कोटी देवतांनी कृपाशीर्वादरूपी काठ्या लावल्या. सर्व देवतांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी अमूल्य साहाय्य केले, यासाठी भगवंताच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०१७)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी अंतर्मनाला जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात