समाजाकडून धर्माचरण करून घ्यायचे आहे ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

चेतन राजहंस

दलित-मुसलमान युती घडवून या देशाला तोडण्याचे कारस्थान चालू आहे. काश्मीरसमवेत दक्षिण भारतातही जिहाद चालू आहे. हिंदु नेत्यांच्या हत्या करून हिंदु समाजाला दिशाहीन करण्याचे कारस्थान चालू आहे. काश्मीरमध्ये हिंदू नामशेष झाले आहेत. अशा परिस्थितीत अन्य धर्मांत धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी घरवापसीचे कार्य एक व्रत म्हणून नियोजनपूर्वक केले पाहिजे. धर्मांतरितांना पुन्हा हिंदु धर्मात आणणे हे काशी यात्रेपेक्षा पवित्र कार्य आहे, असे गोव्यात शुद्धीकरण मोहिम राबवणारे प.पू. मसुरकर महाराज यांनी म्हटले होते. या धारणेतून आम्हाला हे कार्य करायचे आहे. धर्म हा आपल्या नैतिकतेचा मापदंड आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला समाजाला धर्माकडे घेऊन जायचे आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले.

श्री. राजहंस पुढे म्हणाले, हिंदूंनी संघटित प्रयत्न केल्यास हिंदूंना अवश्य विजय मिळणार आहे. हिंदु समाज हा पूर्वीपासून वीर आहे. दुसर्‍या महायुद्धात २५ लक्ष भारतीय सेना ब्रिटिशांच्या बाजूने लढली होती. आमच्या सेनेच्या बळावरच ब्रिटीश या युद्धात जिंकले होते. या युद्धात सर्वाधिक भारतीय सैनिकांना पदके मिळाली आहेत. आपल्या संस्थानिकांकडे युद्धावर गेलेल्या सैनिकांव्यतिरिक्त ४० लक्ष सेना होती. हिंदूंनी नेहमीच पुरुषार्थाची आराधना केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात